
फोटो सौजन्य सोशल मिडिया
गुलमंडीकडून सिटीचौककडे जाणाऱ्या रंगारगल्लीतील सुंदर दूध डेअरीची धोकादायक इमारत महापालिकेने गतवर्षी जमीनदोस्त केली होती. ही इमारत रस्ताबाधित असल्याने तिचा मलबा हटवून जागेचा ताबा घेणे आवश्यक होते. मात्र, मेघावाले यांच्या मालकीच्या या जागेचा ताबा महापालिकेकडे न आल्याने सिमेंट रस्त्याचे कामही रखडले होते. त्यातच संबंधित ठिकाणी छोटे दुकान सुरू झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.
दरम्यान, महापौर समीर राजूरकर यांनी हस्तक्षेप करून संबंधितांशी चर्चा केली. त्यानंतर विरोध निवळला आणि दुपारनंतर मलबा हटविण्यात आला. ही कारवाई आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, प्रभाग एकच्या सहाय्यक आयुक्त लता पुजारी, इमारत निरीक्षक रविंद्र देसाई, सुंदर खरात आणि नागरिक मित्र पथक उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर शनिवारी २४ ऑक्टोबर रोजी उपायुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे पथक मलबा हटविण्यासाठी दाखल झाले, त्यावेळी मेघावाले कुटुंबाने जागेचा मोबदला मिळाल्याशिवाय ताबा देणार नसल्याचे सांगत कारवाईला विरोध केला. मोबदल्यासाठी अर्ज करण्याची सूचना अधिकाऱ्याऱ्यांनी केली.
Navdurga Gaurav Award 2026 : कवठे गावातील १६ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा गौरव पुरस्काराने’ सन्मान