Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: ‘स्मार्ट सिटी’ला अखेर गुंडाळले! अधिकारी-कर्मचारी संभ्रमात; आयुक्तांशी चर्चेनंतर पुढील दिशा स्पष्ट

राज्य शासनाने २१ एप्रिल रोजी अध्यादेश काढून स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाला बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 24, 2026 | 02:36 PM
'स्मार्ट सिटी'ला अखेर गुंडाळले! अधिकारी-कर्मचारी संभ्रमात

'स्मार्ट सिटी'ला अखेर गुंडाळले! अधिकारी-कर्मचारी संभ्रमात

Follow Us
Follow Us:

 

  • ‘स्मार्ट सिटी’ला अखेर गुंडाळले!
  • अधिकारी-कर्मचारी संभ्रमात
  • आयुक्तांशी चर्चेनंतर पुढील दिशा स्पष्ट
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): राज्य शासनाने २१ एप्रिल रोजी अध्यादेश काढून स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाला बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या निर्णयानुसार सर्व प्रकल्प महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार असून, ३० एप्रिलपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परिणामी, गेल्या दशकभरापासून या योजनेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

महापौर समीर राजूकर यांनी सांगितले की, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अमोल येडगे यांच्यासोबत तातडीने बैठक घेऊन पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत याबाबत अंतिम भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. २०१६ पासून शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध पायाभूत व नागरी सुविधा प्रकल्प राबविण्यात आले. एकूण ४० पेक्षा अधिक लहान-मोठे प्रकल्प पूर्ण किंवा प्रगत अवस्थेत आहेत. यापैकी मिटमिटा येथील सफारी पार्क आणि सिडको परिसरातील संत तुकाराम नाट्यगृह हे दोन महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत.

केंद्र शासनाने जून २०२५ पासून नव्या निधीपुरवठ्याला विराम दिल्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाने स्वयंपूर्णतेचा मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली होती. विविध उत्पन्न स्रोत निर्माण करून डिसेंबर २०२६ पर्यंत कोणत्याही शासकीय अनुदानाविना कामकाज चालविण्याची क्षमता विकसित केल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. महापालिकेकडून मालमत्ता कर वसुलीतील सुमारे २ टक्के हिस्सा जवळपास ४ कोटी रुपये स्मार्ट सिटीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही चर्चेत आहे. या निधीतून पुढील प्रकल्पांना गती देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बोजा नको; सकारात्मक भूमिकेची शक्यता

महापौर समीर राजूकर यांनी स्पष्ट केले की, स्मार्ट सिटीचे प्रकल्प सुरू ठेवताना महापालिकेवर आर्थिक ताण येणार नसेल, तर याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. शासनाच्या अध्यादेशाचा अभ्यास करून आणि आयुक्तांशी चर्चा करून अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल.

Chhatrapati Sambhajinagar: ‘भक्ती’ आहे पण ‘पाणी’ नाही! कडाक्याच्या उन्हात भाविकांची पाण्यासाठी वणवण; देवस्थान प्रशासन उदासी

३५ कर्मचारी प्रभावित

सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प प्रमुख, उपप्रकल्प प्रमुख, लेखाधिकारी, लिपीक आदी मिळून सुमारे ३५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय शहर बस सेवेशी संबंधित १५ कर्मचारी एसपीव्हीमार्फत कार्यरत आहेत. अध्यादेशामुळे या सर्वाच्या सेवाभवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एसपीव्ही राहणार, संचालक मंडळ नाही

स्मार्ट सिटीसाठी २०१५ मध्ये स्थापन करण्यात आलेली स्पेशल पर्पज व्हीकल (एसपीव्ही) कंपनी कायम राहणार आहे. मात्र, संचालक मंडळ बरखास्त करण्यात येणार असून त्यांचे अधिकार थेट महापालिका आयुक्तांकडे वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील सर्व निर्णय प्रक्रियेत आयुक्तांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

पुढील दोन दिवस निर्णायक

संपूर्ण प्रकरणात पुढील एक ते दोन दिवस महत्त्वाचे मानले जात आहेत, प्रकल्पांचे हस्तांतरण, कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन आणि आर्थिक व्यवस्थापन यावर स्पष्ट निर्णय झाल्यानंतरच शहरातील स्मार्ट सिटीची पुढील दिशा निश्चित होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘स्कॅनर’ घोटाळ्यावरून खळबळ; मुख्य अभियंता अतुल चव्हाणांच्या बदलीसाठी सरपंच मंगेश साबळे आक्रमक

Web Title: Chhatrapati sambhajinagar smart city board dissolved projects transferred to amc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
2

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.