Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: नागरिकांच्या जमिनी अन् गोपनीय डेटा धोक्यात? छत्रपती संभाजीनगरातील ‘या’ शासकीय कार्यालयात एजंटांचे राज्य

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास दस्त नोंदणी कार्यालयात शासकीय संगणकांवर खाजगी एजंटांनी ताबा मिळवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सविस्तर बातमी वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 31, 2026 | 04:05 PM
Chhatrapati Sambhajinagar: नागरिकांच्या जमिनी अन् गोपनीय डेटा धोक्यात?

Chhatrapati Sambhajinagar: नागरिकांच्या जमिनी अन् गोपनीय डेटा धोक्यात?

Follow Us
Follow Us:
  • नागरिकांच्या जमिनी अन् गोपनीय डेटा धोक्यात?
  • छत्रपती संभाजीनगरातील ‘या’ शासकीय कार्यालयात एजंटांचे राज्य!
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरातील मुद्रांक व दस्त नोंदणी विभाग आधीपासूनच चर्चेत आहे. त्यात नव्याने विस्तारित होणाऱ्या बीडबायपास रोडवरील वसाहतींना लगेच सहकार्य करण्याच्या नावाखाली सरकारी संगणकावर खासगी एजंटांनी ताबा मिळवला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात जागेचा मालक नसतानाही अशा जागेचे रजिस्ट्रेशन केले जात असल्याचे बोलले जात आहे. बनावट कागदपत्र आधारे दस्त नोंदणी केल्याप्रकरणी कालच गुन्हा दाखल झालेला असतानाही कार्यालयात एजंटाची चलती आहे.

डिजिटल सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

बीड बायपास येथील मुद्रांक व दस्त नोंदणी कार्यालय क्रमांक ३ मध्ये खाजगी एजंट शासकीय संगणक हाताळत असल्याचे चित्र वारंवार समोर येत असल्याने कार्यालयाच्या डिजिटल सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यालयात दस्त नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या संगणकांवर अधिकृत कर्मचाऱ्यांऐवजी खाजगी व्यक्तींना प्रवेश कसा दिला जातो, असा सवाल उपस्थित होत आहे. मागील महिनाभरात कथित बोगस दस्त नोंदणीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतरही कार्यालयातील कामकाजात कोणताही बदल झालेला नसल्याची चर्चा आहे.

Karj Mafi e-KYC: कर्जमुक्तीच्या ई-केवायसीला अल्प प्रतिसाद! १.०५ लाख शेतकरी पात्र, मात्र केवायसी ३९ हजार शेतकऱ्यांचीच

बनावट कागदपत्र आधारे दस्त नोंदणींची दखल

अशा परिस्थितीत शासकीय संगणक आणि दस्त नोंदणी प्रणालीवर अनधिकृत व्यक्तींना काम करण्याची मुभा का दिली जाते, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महसूल विभागाच्या अत्यंत संवेदनशील नोंदी, दस्तऐवज आणि नागरिकांची वैयक्तिक माहिती असलेल्या संगणकांवर केवळ अधिकृत अधिकारी आणि कर्मचारी यांनाच प्रवेश असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात काही एजंट संगणक हाताळताना दिसत असल्याने सायबर सुरक्षितता आणि दस्त नोंदणी प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

जर शासकीय संगणकांवर अनधिकृत व्यक्तींकडून काम होत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित कोणाची, तसेच अशा प्रकारामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरवापर किंवा फेरफार होण्याची शक्यता प्रशासनाने तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयातील संगणकांच्या वापराचे ऑडिट, लॉगची तपासणी आणि अनधिकृत व्यक्तींच्या प्रवेशाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

Rapido RTO Action: रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल! अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी आरटीओचा मोठा दणका

Web Title: Chhatrapati sambhajinagar sub registrar office beed bypass private agents scam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • maharashtra news
  • Stamp Duty

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का
1

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
2

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर
3

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
4

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.