Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heat Wave: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४१.४ अंशांवर! प्रशासनाकडून ‘हीट वेव्ह’चा इशारा; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ मोडवर

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.४ अंश तापमानासह उन्हाचा तडाखा वाढला आहे. प्रशासनाने उष्माघात कक्ष सज्ज केले असून १७ एप्रिलला पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. वाचा सविस्तर मार्गदर्शक सूचना.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 16, 2026 | 02:57 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४१.४ अंशांवर!

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४१.४ अंशांवर!

Follow Us
Follow Us:

 

  • सूर्य तळपला, तीन दिवस सांभाळा
  • शहराचा पारा ४१.४ अंशाच्या पुढे
  • प्रशासनाकडून यलो अलर्ट जारी
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढतच आहे. मंगळवारी (१४) यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४१, ४ अंश सेल्शियसची नोंद झाली आहे. यात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याने शहरवासीयांनी काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. प्रशासनानेदेखील उष्माघात रुग्णांसाठी आवश्यक तयारी केली असून, महापालिका, घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालयसह जिल्हाभरातील आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यातच अवकाळी पावसाचाही अंदाज व्यक्त झाला असून, प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सूर्य आग ओकत आहे

यंदा मार्चच्या अखेरीस उत्साहाची दाहकता वाढीस लागली आहे. एप्रिलमध्ये यात आणखी वाढ झाली. सकाळी ९ वाजेपासूनच। सूर्य तळपणे सुरु झाले आहे तर दुपारच्या वेळी सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. यातच उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे उकाड्यात आणखीच भर पडत आहे. ही हिट वेव्ह आणखी काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रविवारी ४० अंशापर्यंत गेले तापमान सोमवारी ४१.२ तर मंगळवारी विक्रमी ४१. ४ पर्यंत वाढले होते, उष्णता वाढल्याने १७ पर्यंत हवामानात बदल होणार आहेत. कमाल आणि किमान तापमानात ४ ते ५ अंशाची घट होण्याचा अंदाज आहे.

तहान नसेल तरीही नागरिकांनो, पाणी प्या

आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करा, बाहेर पडताना हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावे. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. पाळीव प्राणी आणि गुरांना सावलीत ठेवा, त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्या, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

Sanjay Shirsat : “महापालिकेच्या इमारतीत भुताटकी, इथे आत्मे वावरतात”, संजय शिरसाट यांचा दावा, आता नवा वाद सुरु होणार?

यलो अलर्ट जारी

प्रादेशिक हवामान केंद्राने संभाजीनगर शहर व जिल्ह्यासाठी १६ ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली असून १५ व १६ एप्रिल रोजी ऑरेंज तर १७ एप्रिल रोजी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या तिन्ही दिवशी शहर व परिसर अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आदेशानंतर प्रशासन सज्ज

राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. शहरात उन्हामुळे होणाऱ्या उष्माघाताच्या उपचारासाठी घाटीसह महापालिका, जिल्हा परिषदेतर्फे आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. आवश्यक डॉक्टर स्टाफ आणि औषधांची उपलब्धतताही करण्यात आली आहे.

पक्ष्यांसाठी पिण्याचे भांडे

पक्षी, खार अशा मुक्या जनावरांसाठी काही स्वयंसेवी संस्थांकडून पाण्याचे भांडे वाटप करण्यात आले आहेत. तर गाय, भटके श्वानांसाठीदेखील शहरात पाण्याचे भांडी ठेवण्यात आली आहेत.

डॉक्टरांना भेटा

चक्कर येणे, सतत घाम येणे, डोकेदुखी किवा अशक्तपणा जाणवल्यास ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: उच्च न्यायालयाच्या वकिलाची निर्घृण हत्या; झुडपात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Web Title: Chhatrapati sambhajinagar temperature record heat wave rain alert 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • heat wave

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
1

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम
2

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला
3

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू
4

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.