Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका

छत्रपती संभाजीनगरात विनाहेल्मेट सरकारी कर्मचाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई! १२ शासकीय कार्यालयांसमोर ३०३ कर्मचाऱ्यांना ३ लाखांहून अधिक रुपयांचा दंड.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 12, 2026 | 02:04 PM
विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक!

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक!

Follow Us
Follow Us:
  • विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक!
  • १२ कार्यालयांसमोर कारवाई
  • ३०३ जणांना ३ लाखांचा दणका
छत्रपती संभाजीनगर, शहर प्रतिनिधी: शासकीय कार्यालयात विना हेल्मेट दुचाकीवरून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहतूक विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. शहरातील १२ शासकीय कार्यालयांसमोर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३०३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट दुचाकी वाहनचालकांना तीन लाख तीन हजार रुपयांचा दंड ठोठविण्यात आला आहे. बारा हजार रुपयांचा दंड वसूलही करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पोलिस विभागातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दुचाकी वापरताना हेल्मेट सक्तीने वापरण्याबाबत सूचना केली आहे.

पोलिस विभागासह सर्व शासकीय कार्यालयांमध्येही दुचाकी वापरणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांनी हेल्मेट वापरावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनेच्या अनुषंगाने ११ ऑगस्ट रोजी वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील विविध भागातील शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट दुचाकी वापरणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कारवाई सुरू केली.

या कारवाई अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जीएसटी भवन, आरोग्य संचालनालय, जीवन प्राधिकरण कार्यालय, पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालय, वन विभाग, ज्ञान वैज्ञानिक प्रयोगशाळा, शासकीय मेंढी पालन केंद्र तसेच इतर कार्यालयांसमोर विना हेल्मेट मोटारसायकलवरून कार्यालयांमध्ये प्रवेश करणाऱ्या ३०३ अधिकारी कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

या कारवाईत तीन लाख तीन हजारांचा दंड ठोठविण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर, सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंगेश जगताप, रेखा लोंढे, पवन चौधरी यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरघे यांच्या पथकाने केली.

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा

शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, हेल्मेट केवळ पोलिसांच्या दंडापासून वाचविण्यासाठी नसून, स्वतःच्या मौल्यवान जीवनाच्या रक्षणासाठी आहे. हेल्मेट वापरण्याची शिस्त सर्वांना लागावी.

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Web Title: Chhatrapati sambhajinagar traffic police action government employees helmet fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Action on Police
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Helmet
  • Traffic Police

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
3

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
4

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.