Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा! ७५० शेतकऱ्यांना नोटिसा; धावपट्टी १२ हजार फुटांपर्यंत वाढणार

छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी ५४ हेक्टर जमिनीच्या संपादनाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. ७५० शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून लवकरच मोबदला जाहीर होईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 03:05 PM
चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा! (Photo Credit- X)

चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा!
  • ७५० शेतकऱ्यांना नोटिसा
  • धावपट्टी १२ हजार फुटांपर्यंत वाढणार
छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादन प्रक्रियेला महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भूसंपादनाची कलम १९ अंतर्गत अंतिम अधिसूचना नुकतीच राजपत्रात प्रसिद्ध झाली असून सुमारे ७५० शेतकऱ्यांच्या जवळपास ५४ हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. प्रभावित जमीनधारकांना कलम २१ (१) अंतर्गत वैयक्तिक नोटिसा देखील देण्यात आल्या आहेत. आता अंतिम मोबदला जाहीर करण्यासाठी आवश्यक निधीची प्रतीक्षा असून निधी मिळताच अवॉर्ड जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

चिकलठाणा विमानतळावर मोठ्या क्षमतेची विमाने उत्तरवण्यासाठी धावपट्टीचा विस्तार आवश्यक आहे. सध्या धावपट्टीची लांबी ९,३०० फूट असून ती १२ हजार फूट करण्याचा प्रस्ताव आहे. धावपट्टीसह टॅक्सी रनवे उभारणीसाठी १३९ एकर जमीन संपादन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत चिकलठाणा, मुर्तुजापूर, मुकुंदवाडी परिसरातील जमिनींचा समावेश आहे. मार्च २०२३ मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी ७३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर ८ जानेवारी २०२५ रोजी कलम ११(१) अंतर्गत ५८ हेक्टर क्षेत्रासाठी प्रारंभिक अधिसूचना प्रसिद्ध झाली. अधिसूचनेनंतर प्रशासनाकडे ३०० हून या अधिक हरकती आणि आक्षेप दाखल झाले होते. त्यावर सुनावणी घेऊन संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar: भाजपचे अनिल मकरिये स्थायी समिती सभापतीपदी विजयी; एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव

भूसंपादन प्रक्रियेदरम्यान वन विभाग, भूमिअभिलेख आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बाधित मालमत्तांचे मूल्यांकनही पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने प्रस्तावित क्षेत्रात काही बदल सुचविल्यामुळे प्रक्रियेला काही काळ विलंब झाला. प्रस्तावित १३९ एकर क्षेत्रापैकी १.५ एकर जमीन वगळणे आणि दुसऱ्या गटात ०.१६ एकर जमीन वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार नव्याने प्रक्रिया पूर्ण करून अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली. शासनाकडून ३०४ कोटी ८५ लाख उपलब्ध झाले. संपूर्ण भूसंपादनासाठी सुमारे ७०० कोटींचा अतिरिक्त निधी आवश्यक आहे. निधी मिळताच अंतिम मोबदला जाहीर करून कार्यवाही होईल.

विमानांसाठी धावपट्टी वाढविण्याची योजना

चिकलठाणा विमानतळावर मोठ्या क्षमतेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमाने उतरू शकावीत, यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्याची योजना आहे. सध्या असलेली ९,३०० फुटांची धावपट्टी १२ हजार फुटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या विस्तारामुळे भविष्यात विमानसेवा वाढविणे आणि मोठ्या विमानांचे संचालन शक्य होणार आहे. यासाठी धावपट्टी आणि टॅक्सी रनवे उभारणीसाठी एकूण १३९ एकर जमीन संपादन केली जात आहे.

Samruddhi Highway Accidents: वेगवान समृद्धी महामार्ग ठरतोय ‘मृत्युमार्ग’! चार वर्षांत १ हजार ३९९ अपघात; तर ११२ जणांचा…

Web Title: Chikhalthana airport expansion land acquisition final notification published

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • airport
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट
1

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
2

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Hydroponic-Marijuana : अहमदाबाद विमानतळावर 8.9 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त, मुंबईतील नागरिकाला अटक
3

Hydroponic-Marijuana : अहमदाबाद विमानतळावर 8.9 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त, मुंबईतील नागरिकाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.