
गोड बोलून भावाने बहिणीला डोंगरावर नेलं, अन् केलं भयानक कृत्य; संभाजीनगरमधील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरातून निघून गेलेली बहीण घरी परतल्यानंतर तिच्या भावाने तिला गोड बोलून डोंगरावर नेलं आणि २०० फूट खोल दरीत ढकलून दिलं. यात तिचा मृत्यू झाला असून निर्दयी भावाच्या भयंकर कृत्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील वाळूज परिसरात ही भयंकर घटना घडली.
प्रेमाची भयानक शिक्षा! प्रेयसीच्या कुटुंबाची मारहाण, प्रियकराचा मृत्यू; मृतदेह फेकला जंगलात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी काही कारणामुळे घर सोडून निघून गेली होती. घर सोडून निघून गेलेली बहीण पुन्हा घरी आली. तिची समजूत काढण्याचा कुटुंबातील सगळ्यांनीच प्रयत्न केला. त्यानंतर ती जालन्यातील अंबड तालुक्यातील गावातून ती आपल्या काकाकडे आली. ८ दिवसांपूर्वीच ती काकाच्या वाळदगाव येथील घरी राहायला आली होती. तिथंही तिची समजूत काढण्यात आली. तिच्या काकांनी मुलीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण चुलत भावाच्या मनात तिच्याबद्दल राग होता.
एकेदिवशी त्यानं गोड बोलून तिला खवल्या डोंगरावर नेलं. तिथून खोल दरीत तिला ढकलून दिलं. यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी चुलत भावाला अटक केली आहे. हाताला राखी बांधून घेत आयुष्यभर संरक्षणाचं वचन देणाऱ्या भावानंच बहिणीला संपवलं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील भावी येथे धक्कादायक घटना घडली आहे. शिवारात विहिरीचे पाणी देण्यावरून तुफान हाणामारीत तिघांचा बळी गेला आहे. ही घटना दिनांक 5 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारात झाली. यामध्ये एका कुटुंबातील आप्पा परमेश्वर काळे व सुनील परमेश्वर काळे व दुसऱ्या कुटुंबातील आप्पा भाऊ काळे या तिघा जणांना जागी जीव गमावा लागला. तर वसाला आप्पा काळे ही गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी धाराशिव येथे दाखल करण्यात आले आहे.
Baba Siddique case: बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठी अपडेट: मुंबई पोलिसांकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वाशी तालुक्यातील भावी येथील पारधी समाजात शेतीला पाणी देण्यावरून विहिरीचे पाणी वाटपावरून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. एकमेकांना जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली. मध्यरात्री शेतात हा भयानक प्रकार सुरू होता. या हाणामारीत जीव जाईपर्यंत एकमेकांना मारल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयितांना ताब्यात घेतलं..