Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या १७ महिन्यांत १,२४४ अपघातांमध्ये ७६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम राबवून १३.८४ लाखांचा दंड वसूल केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 12, 2026 | 02:22 PM
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल
Follow Us
Follow Us:
  • वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका
  • दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई
  • १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांनी चिंतेचे स्वरूप धारण केले असून, गेल्या १७ महिन्यांत १,२४४ अपघातांमध्ये तब्बल ७६७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. अपघातांचा वाढता आलेख रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. ८ जून रोजी जिल्हाभरात झालेल्या कारवाईत १,१४९ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून १३ लाख ८४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

यांच्यावर उगारला बडगा

जिल्ह्यातील सर्व २३ पोलिस ठाण्यांसह जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकांनी एकाच वेळी रस्त्यावर उतरून ही मोहीम राबविली. हेल्मेट न वापरणे, अतिवेगाने वाहन चालविणे, राँग साईडने प्रवास करणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे आणि स्टंटबाजी अशा नियमभंग करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. अपघातांमागील प्रमुख कारणेही हीच असल्याचे पोलिसांच्या नोंदींमधून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते मे २०२६ या कालावधीत झालेल्या १,२४४ अपघातांपैकी ८५२ अपघात दुचाकींशी संबंधित होते, या अपघातांत ५०१ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला, तर शेकडो जण गंभीर जखमी झाले. हेल्मेटचा वापर टाळणे आणि वेगमर्यादेकडे दुर्लक्ष करणे ही दुचाकी अपघातांमागील प्रमुख कारणे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

संभाजीनगरमध्ये अनधिकृत नळधारकांचे धाबे दणाणले, पोलीस बंदोबस्तात मनपाची हाय-व्होल्टेज कारवाई; ८ दिवसांचा अल्टिमेटम!

२०२५ मध्ये ५३८ जणांचा मृत्यू

सन २०२५ मध्ये जिल्ह्यात ८४६ अपघातांची नोंद झाली. त्यापैकी ४८१ प्राणघातक अपघातांत ५३८ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ४५५ जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, ३४२ दुचाकी अपघातांतच ३५७जणांनी प्राण गमावले. त्यामुळे दुचाकी सुरक्षेवा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

यंदाच्या पाच महिन्यांतच २२९ जणांचा बळी

जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांत ३९८ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातांमध्ये २२९ जणांचा मृत्यू झाला असून १२१ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील २४० दुचाकी अपघातांत १४४ जणांचा बळी गेला. तर इतर वाहनांच्या १५८ अपघातांमध्ये ८५ जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्…

Web Title: Crackdown on traffic violators action taken against 1149 motorists in a single day fines totaling 1384 lakh collected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Accident
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Traffic Police

संबंधित बातम्या

Buldhana: ‘एचएसआरपी’ नसलेल्या ७४० वाहनांवर कारवाई; ५७ हजाराचा दंड वसूल; परिवहन विभागाची मोहीम
1

Buldhana: ‘एचएसआरपी’ नसलेल्या ७४० वाहनांवर कारवाई; ५७ हजाराचा दंड वसूल; परिवहन विभागाची मोहीम

काळ्या काचांच्या वाहनांवर माळेगाव पोलिसांचा दणका; काचा उतरवून दंडात्मक कारवाई, नियमभंग करणारी वाहने केली डिटेन
2

काळ्या काचांच्या वाहनांवर माळेगाव पोलिसांचा दणका; काचा उतरवून दंडात्मक कारवाई, नियमभंग करणारी वाहने केली डिटेन

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
3

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
4

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.