संभाजीनगरमध्ये अनधिकृत नळधारकांचे धाबे दणाणले
मोहिमेदरम्यान सहाय्यक अभियंता मिलिंद भामरे, पथक प्रमुख रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता अमित पंडागळे, विक्रांत सावंत, सुमित बोराडे यांच्यासह अनधिकृत नळजोडणी शोध व निर्मूलन पथकाने सहभाग घेतला. कारवाई सुरू असतानाच अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या निर्देशानुसार तसेच नगरसेवक अब्दुल मतीन खान यांच्या विनंतीनंतर नागरिकांना दिलासा देत मोहीम तात्पुरती थांबविण्यात आली.
प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्…
बनेवाडीतील अनधिकृत नळजोडणीधारकांना आठ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून जोडण्या नियमित कराव्यात. मुदत संपल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता नळजोडण्या तोडणे, दंडात्मक कारवाई करणे तसेच कायदेशीर प्रक्रिया राबविणे अशा कठोर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यावेळी अनधिकृत नळजोडणीधारकांना आवश्यक कागदपत्रांसह संचिका तयार करून नियमानुसार जोडण्या अधिकृत करण्याचे आवाहन करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कनेक्शन नियमित न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही दिला आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी आणि नियोजनबद्ध वितरण सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.






