फोटो सौजन्य सोशल मिडिया
शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट करणारा प्रश्न म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेली घरगुती खर्चाची चिंता. एकीकडे शेतात उभा असलेला शेतीमाल वाळून जात आहे, त्यातून उत्पन्न मिळण्याची आशा कमी होत आहे; तर दुसरीकडे घरातील किराणा सामान, जीवनावश्यक वस्तू आणि दैनंदिन गरजांच्या खर्चाचे गणित वाढतच आहे.
शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, पीक हातातून निसटत आहे आणि घर चालवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर मात्र वाढत आहेत. मग शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? हा प्रश्न आज नाचनवेल-पिशोर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या मनात घुमत आहे. घरात चूल पेटवण्यासाठी पैसा हवा, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हवा, आजारपणासाठी पैसा हवा, गुराढोरांच्या चारा-पाण्यासाठी पैसा हवा आणि पुढील हंगामासाठी पुन्हा शेतीत पैसा गुंतवावा लागणार आहे. मात्र उत्पन्नाचा मुख्य आधार असलेली शेतीच अडचणीत आली आहे.
Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी
शेतीसाठी घेतलेले कर्ज, व्यापाऱ्यांची उधारी, बियाणे-खते-औषधांचे पैसे आणि घरातील रोजचा खर्च या सगळ्यांचा ताळमेळ घालताना शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. वर्षभर कष्ट करूनही शेवटी हातात काहीच उरले नाही, तर पुढचा संसाराचा गाडा ओढायचा कसा, असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे. संबंधित विभागाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून पंचनामे करावे.
पिकांसोबतच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने गुराढोरांना पाणी कुठून द्यायचे आणि चारा कुठून आणायचा, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. माणसांच्या संसारासोबत जनावरांची जबाबदारीही शेतकऱ्यांनाच पेलावी लागत आहे.
चाललेले पीक आहे, तर दुसऱ्या हातावर घरखर्चाचा भार आहे. शेतात उत्पन्न नाही, पण घरात खर्च थांबत नाही. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी.






