Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: मनपाच्या लेखा विभागात धावपळ, कथित घटनेनंतर कामाला वेग; रखडलेल्या २५० फाईल्सना अखेर गती

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या लेखा विभागात लिपिकाला झालेल्या मारहाणीनंतर दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या २५० फाईल्सना अचानक गती मिळाली आहे. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 02, 2026 | 03:42 PM
Chhatrapati Sambhajinagar: मनपाच्या लेखा विभागात धावपळ, कथित घटनेनंतर कामाला वेग; रखडलेल्या २५० फाईल्सना अखेर गती
Follow Us
Follow Us:

 

  • मनपाच्या लेखा विभागात धावपळ
  • कथित घटनेनंतर कामाला वेग
  • रखडलेल्या २५० फाईल्सना अखेर गती
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या लेखा विभागातील एका कर्मचाऱ्याला झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणानंतर विभागातील कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेनंतर दोन महिन्यांपासून विविध टेबलांवर प्रलंबित असलेल्या सुमारे २५० फाईलांना अचानक गती मिळाल्याने मनपा वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी एका ठेकेदाराचे बिल मंजुरीसाठी सादर केलेल्या फाईलवरून लेखा विभागातील एका लिपिकासोबत वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारी झाल्याचा आरोप करत संबंधित कर्मचाऱ्याने सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर मनपा मुख्यालयात एकच खळबळ उडाली. दरम्यान, मनपा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर अभियंत्यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लेखा विभागात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आणि काही फाईलांचा मागमूस लागत नसल्याची चर्चा सुरू होती. कथित मारहाण प्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी सुमारे २५० फाईल बाहेर काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या फाईल विविध स्तरांवर मंजुरीसाठी अडकून पडल्या होत्या.

स्वाक्षऱ्यांचा सपाटा

घटनेनंतर विभागातील विविध टेबलांवर स्वाक्षऱ्यांची मॅरेथॉन सुरू झाल्याचे सांगितले जाते. अनेक दिवस मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या फाईल एका मागोमाग एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर सरकत अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे समजते.

Chhatrapati Sambhajinagar Figures: पुतळ्यांबाबत महापालिकाच अंधारात! ११५ पैकी तब्बल ५१ पुतळ्यांचे रेकॉर्ड गायब, ११ अनधिकृत

ठेकेदारांमध्ये समाधानाची भावना

बिल मंजुरीसाठी महिनोनमहिने पाठपुरावा करणाऱ्या अनेक ठेकेदारांनी लेखा विभागातील अचानक वाढलेल्या गतीचे स्वागत केले आहे. नियमितपणे कार्यालयात हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याची तक्रार करणाऱ्या ठेकेदारांना आता प्रलंबित फाईल मार्गी लागण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

पारदर्शकतेचे आव्हान

मारहाण प्रकरणानंतर अचानक वाढलेली फाईल हालचाल आणि रखडलेल्या प्रस्तावांना मिळालेली गती यामुळे मनपा प्रशासनासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. लेखा विभागातील कामकाजाची पद्धत, फाईल प्रलंबित राहण्याची कारणे आणि त्यामागील वस्तुस्थिती याबाबत सखोल चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मनपात समाविष्ट होऊन १० वर्षे झाली, तरी सातारा-देवळाई तहानलेलाच! नागरिकांची ६०० रुपयांना टँकर घेण्याची वेळ

Web Title: Flurry of activity in municipal accounts department work accelerates following alleged incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
1

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम
2

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला
3

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू
4

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.