Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२५ वर्षे मोफत वीज! दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची ‘SMART’ योजना; काय आहे ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र’ स्कीम?

महावितरणची 'SMART' योजना: दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना २५ वर्षे मोफत वीज आणि उत्पन्न. ₹४७,५०० पर्यंत अनुदान. अर्ज प्रक्रिया, लाभ आणि उद्दिष्टे जाणून घ्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 05, 2025 | 03:59 PM
२५ वर्षे मोफत वीज! दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची 'SMART' योजना (Photo Credit - X)

२५ वर्षे मोफत वीज! दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची 'SMART' योजना (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • गरीब ग्राहकांना २५ वर्ष मोफत वीज !
  • महावितरणचा पुढाकार
  • घरांवर एक किलोवॅटचा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवणार
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना सलग २५ वर्षे मोफत वीज उपलब्ध होणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. मात्र यासाठी राज्य शासनाची स्मार्ट योजना समजून घेणे गरजेचे असणार आहे. आर्थिक दुर्बळ घटकांच्या घरांवर एक किलोवॅट (1 kWp) क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप’ (स्मार्ट) योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

योजनेसाठी तब्बल ६५५ कोटी रुपयांची तरतूद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली आहे. दारिद्र्य रेषेखालील १.५४ लाख तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ ३.४५ लाख अशा महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी ६५५ कोटी रुपयाची तरतूद केली आहे. ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर राबविण्यात येणार आहे. महावितरणच्या नुकत्याच झालेल्या संचालक व मुख्य अभियंत्याच्या राज्यस्तरीय बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

भेदभाव संपला! जरंडी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम; ‘पहिली मुलगी’ म्हणजे ‘लक्ष्मी’, गाव करतो सन्मान

डबल अनुदानामुळे कमी भरावा लागणार हिस्सा

केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्यामध्ये ग्राहकांना एक किलोवॅटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ₹३० हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. स्मार्ट योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडूनही अनुदान मिळणार असल्याने वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून प्रकल्प बसविता येईल. स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅटचा सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ₹३० हजार रुपये तर राज्य सरकारकडून ₹१७,५०० रुपये अनुदान मिळेल.

FAQs (संबंधित प्रश्न)

१. SMART योजना कशासाठी आहे?

‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप’ (SMART) योजना दारिद्र्य रेषेखालील (BPL) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ (EWS) घटकांना त्यांच्या घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Rooftop) बसवून सलग २५ वर्षे मोफत वीज उपलब्ध करण्यासाठी आहे.

२. या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?

उत्तर: महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील (१.५४ लाख) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ (३.४५ लाख) अशा एकूण ५ लाख घरगुती वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

३. लाभार्थींना किती अनुदान मिळते?

उत्तर: दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना केंद्र सरकारकडून ₹३०,००० (PM सूर्य घर) आणि राज्य सरकारकडून ₹१७,५०० असे एकूण ₹४७,५०० चे अनुदान मिळते.

४. लाभार्थ्यांना प्रकल्पासाठी पैसे भरावे लागतील का?

उत्तर: केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित अनुदानामुळे लाभार्थी ग्राहकांना सौर प्रकल्प बसवण्यासाठी खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे.

वीजग्राहकांसाठी दिलासा! ‘टीओडी मीटर’मुळे ७५ लाखांची बचत; संभाजीनगर परिमंडळातील घरगुती ग्राहकांचा फायदा

Web Title: Free electricity for 25 years mahavitarans smart scheme for families below poverty line

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Electricity Bill
  • free electricity
  • state government

संबंधित बातम्या

Crime News: अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेची मोठी कारवाई; एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात अटक
1

Crime News: अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेची मोठी कारवाई; एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात अटक

Sambhajinagar Water Crisis: धरण उशाला अन् कोरड घशाला…. वीजपुरवठा खंडित, शहरात पुन्हा जलसंकट
2

Sambhajinagar Water Crisis: धरण उशाला अन् कोरड घशाला…. वीजपुरवठा खंडित, शहरात पुन्हा जलसंकट

कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा! जिल्हा रुग्णालयात ‘मोफत किमोथेरपी’ सुरू; खासगीतील महागड्या उपचारांतून सुटका
3

कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा! जिल्हा रुग्णालयात ‘मोफत किमोथेरपी’ सुरू; खासगीतील महागड्या उपचारांतून सुटका

मनपा निवडणूकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज; ‘या’ १० केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर! वेबकास्टिंग आणि सीसीटीव्हीचा पहारा
4

मनपा निवडणूकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज; ‘या’ १० केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर! वेबकास्टिंग आणि सीसीटीव्हीचा पहारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.