Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर! विकासकामांचा घेतला आढावा; बैठकीत अजितदादांना श्रद्धांजली

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ८४९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी क्षेत्रनिहाय कामांचे नियोजन करण्याचे आदेश दिले असून, आगामी वर्षासाठी १५०० कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 13, 2026 | 02:36 PM
पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर! (Photo Credit- X)

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर!
  • विकासकामांचा घेतला आढावा
  • बैठकीत अजितदादांना श्रद्धांजली
Chhatrapati Sambhajinagar DPC Meeting: छत्रपती संभाजीनगरमध्ये विकासकामे करतांना ती त्या-त्या क्षेत्रानुसार समायोजित करावीत जेणेकरुन कामांचे नियोजन करणे सुलभहोऊन अनेक कामे क्षेत्रात करता येतील, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी आज दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. या बैठकीस इमाव, अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावे, विधान परिषद सदस्य आ. संजय केणेकर, विधानसभा सदस्य आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. प्रशांत बंब, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. पालक सचिव हर्षदीप कांबळे हे दूरदृष्य प्रणालीने सहभागी झाले होते.


सन २०२५-२६ मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करीता ७३५ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना करीता १०४ कोटी रुपये तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना १० कोटी ४६ लक्ष रुपये असा एकूण ८४९ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या खर्चाचा आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला.

दरम्यान, सन २०२६-२७ मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करीता वित्तीय मर्यादा ५२६ कोटी ८३ लक्ष रुपये इतकी होती. यंत्रणांनी प्रत्यक्षात २०३१ कोटी ९७ लक्ष रुपयांची मागणी केली असून १५०० कोटी रुपयांचा प्रस्तावित आराखडा आहे. सन २०२५-२६ च्या तुलनेत सन २०२६-२७ साठी ७६५ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली. त्यास समितीची मान्यता दिली.

शेतकरी घेणार इस्राईलमध्ये आधुनिक शेतीचे धडे! १० दिवसांचा विशेष अभ्यास दौरा; कृषी अधिकाऱ्यांसह पथक रवाना

शिक्षण विभागाच्या अहवालास मुदतवाढ

आ. प्रशांत बंब यांनी शालेय शिक्षणाचा खालावत चाललेला दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नांचा अहवाल मागणी केला होता. समिती समोर सादर झालेला अहवाल हा वस्तुनिष्ठ नसल्याने शिक्षणाधिकारी यांनी प्रस्तावित केलेल्या कारवाईसह अहवाल सादर करावा. त्यासाठी वाढीव मुदत द्यावी, असे सांगितले. पालकमंत्री शिरसाट यांनी याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ बैठक घेऊन अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.

अजितदादांना श्रद्धांजली..

बैठकीच्या प्रारंभी दिवंगत अजितदादा पवार यांचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या जिल्ह्यातील भेटींवर आधारीत जिल्हा माहिती कार्यालयाने केलेली चित्रफित दाखवून व दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शासकीय इमारतींवर सौरऊर्जा

मंत्री अतुल सावे यांनी शासकीय इमारतीचे सौरीकरण करावयाचे असल्याने त्या कामासाठी जादा निधी शिल्लक ठेवावा असे निर्देश दिले. आ. अनुराधा चव्हाण यांनी आरोग्य योजनांच्या अंमलबजावणी बाबत प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक विधानसभा क्षेत्र अॅनिमियामुक्त करण्याचा उपक्रम राबवावा, अशी मागणी केली. सादरीकरण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले, सूत्रसंचालन भारत वायाळ यांनी केले.

रोहित्रासाठी जादा निधी द्या..

आ. रमेश बोरनारे यांनी ग्रामीण भागात विद्युत रोहित्रे निकामी होण्याचे प्रमाण वाढत चालले असून त्यासाठी जादा निधी द्यावा अशी मागणी केली. आ. भुमरे यांनी क्षेत्रनिहाय प्राप्त रोहित्र व त्याचे वितरण याचा अहवाल वीज वितरण कंपनीने सादर करावा, अशी मागणी केली. तसेच निरंतर योजनेचा अहवालही सादर करावा अशी मागणी केली. तसेच पैठण शहरात आलेल्या महापूरात निकामी झालेले रोहित्र तातडीने बदलून मिळावे अशी मागणी केली.

संभाजीनगरमध्ये हायड्रोलिक चाचणीला ‘ब्रेक’! कंत्राटदाराची हमीपत्रानंतरही टाळाटाळ; प्रशासनाचा चाचणी न घेण्याचा निर्णय

Web Title: Guardian minister approves rs 849 crore fund for district development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • MAL Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.