
फोटो सौजन्य सोशल मिडिया
महापालिकेने शहरातील मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण करून मालमत्ता कराची आकारणी अधिक अचूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मालमत्तांच्या नोंदी अद्ययावत करून करआकारणीतील तफावत दूर करण्यासाठी सुमारे ४० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. पहिल्या निविदा प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेला पुन्हा निविदा मागवाव्या लागल्या.दुसऱ्या निविदा प्रक्रियेत तीन एजन्सी सहभागी झाल्या. त्यांचे टेक्निकल बीड उघडल्यानंतर संबंधित कागदपत्रे, तांत्रिक पात्रता आणि निकषांची तपासणी करून फायनान्स बीड उपडण्यासाठी पात्र एजन्सी निश्चित करणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने ही पुढील कार्यवाही थांबली आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच निविदा प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार आहे.
आचारसंहितेमुळे महापालिकेच्या प्रस्तावित नव्या विकासकामांवरही परिणाम होणार आहे. सुरू असलेल्या कामांना याचा थेट फटका बसणार नसला, तरी नवीन कामांच्या निविदा प्रसिद्ध करणे, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम घेण्यावर निबंध राहणार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन विकासकामांशी संबंधित निर्णय रखडण्याची शक्यता आहे.आचारसंहितेचा परिणाम महापालिकेच्या राजकीय कामकाजावरही झाला आहे. सर्वसाधारण सभा, स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांच्या बैठका घेता येणार नसल्याने मंजुरीच्या प्रतीक्षेतील विषयांवर निर्णय होणार नाहीत. प्रशासनाचे नियमित कामकाज सुरू राहणार असले, तरी पदाधिकारीस्तरावरील निर्णय प्रक्रियेला मात्र ब्रेक लागला आहे.
Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी
शहरातील मालमतांचे पुनर्सर्वेक्षण कसन मालमता आणि महापलिता नीटी यांची सांगड चाली मालमत कराची अकारणी अद्ययावत करणे आणि करआधारणी अधिक अचूक करणे, फेरसर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या निविदेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दुस-यांदा निविद मागविण्यात आली. या प्रक्रियेत जैन एजन्सी सहाभागी आल्या, मात्र आचारसंहितेमुळे त्यांदी तांत्रिक जननी पुढे जाऊ एकलेली नाही,आणि लोकार्पण कार्यक्रम घेण्यावर निबंध राहणार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन विकासकामांशी संबंधित निर्णय रखडण्याची शक्यता आहे.
Chhatrapati Sambhajinagar Marathi News: संभाजीनगर मराठी बातम्या …