Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSEDCL Abhay Yojana 2026-27 : महावितरणची अभय योजना जाहीर; संभाजीनगरमधील लाखो ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा

MSEDCL Abhay Yojana 2026-27 : महावितरणने छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील कायमस्वरूपी आणि तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी 'अभय योजना २०२६-२७' जाहीर केली आहे. या योजनेचा ३ लाख ६५ हजार १५७ ग्राहकांना लाभ मिळणार

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 21, 2026 | 03:48 PM
3.65 Lakh Consumers in Sambhajinagar to Get Electricity Bill Relief ( संभाजीनगरमधील ३.६५ लाख ग्राहकांना वीजबिलात दिलासा मिळणार ) फोटो सौजन्य AI

3.65 Lakh Consumers in Sambhajinagar to Get Electricity Bill Relief ( संभाजीनगरमधील ३.६५ लाख ग्राहकांना वीजबिलात दिलासा मिळणार ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • पात्र ग्राहकांकडे सुमारे ६४४ कोटी ८६ लाख रुपयांची मूळ थकबाकी  
  • आर्थिक सवलतीचा फायदा घेण्याचे आवाहन  
  • पुनर्जोडणी शुल्क, सर्व्हिस कनेक्शन शुल्क माफ करणार
MSEDCL Abhay Yojana 2026-27 :  छत्रपती संभाजीनगर कायमस्वरूपी तसेच तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च दाब व लघुदाब ग्राहकांसाठी महावितरणतर्फे ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील तब्बल ३ लाख, ६५ हजार १५७ थकबाकीदार ग्राहकांना, घेता येणार आहे. पात्र ग्राहकांनी योजनेत विविध सवलतींचा लाभ घेऊन थकबाकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात कायमस्वरूपी व तात्पुरता बीजपुरवठा खंडित असलेल्या पात्र ग्राहकांकडे सुमारे ६४४ कोटी ८६ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना सुमारे २०५ कोटी ५६ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे.

अभय योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत.

पात्र ग्राहकांकडे सुमारे ६४४ कोटी ८६ लाख रुपयांची मूळ थकबाकी

शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित असलेल्या पात्र ग्राहकांकडे सुमारे ६४४ कोटी ८६ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना सुमारे २०५ कोटी ५६ लाख रुपयांचे देव्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे. याशिवाय, १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीच्या एकरकमी भरण्यावर १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार असल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. अभय योजना २०२६-२७’मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि ऑनलाइन आहे. ग्राहकांना महावितरणच्या अधिकृत पोर्टलवरून किंवा मोबाईल अॅपद्वारे योजनेसाठी अर्ज करता येईल.

Sambhajinagar News : वाळूजला स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग मोकळा? १२ ग्रामपंचायतींच्या एकत्रीकरणाची तयारी सुरू

आर्थिक सवलतीचा फायदा घेण्याचे आवाहन

धकबाकीदार ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन व्याज व विलंब आकाराच्या मोठ्या आर्थिक सवलतीचा फायदा घ्यावा आणि थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरण मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले. शहर मंडलातील ५८ हजार ३८४ ग्राहकांकडे २१६ कोटी ६ लाख रूपये मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना ८६ कोटी ६० लाख विलंब आकार व व्याज माफ होणार आहे. ग्रामीण मंडलातील १ लाख ३३ हजार ५७५ ग्राहकांकडे १४९ कोटी ६८ लाख रुपयांची मूळ धकबाकी असून, त्यांना २६ कोटी ८१ लाख रुपये व्याज व विलंब आकारातून शंभर टक्के सवलत मिळणार आहे. तर जालना मंडलातील १ लाख ७३ हजार १९८ ग्राहकांकडे २७९ कोटी १२ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना ९२ कोटी १४ लाख रुपये व्याज व विलंब आकार माफ होणार आहे.

पुनर्जोडणी शुल्क, सर्व्हिस कनेक्शन शुल्क माफ करणार

या योजनेअंतर्गत ग्राहकांच्या एकूण बकवाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार शंभर टक्के माफ करण्यात येणार आहे. याशिवाय, उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यामध्ये आणखी १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच थकबाकी हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लघुदाच ग्राहकांना ५० टक्के डाउन पेमेंट भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल, तर उच्चदाब ग्राहकांसाठी तीन ते सहा हप्त्यांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, २० किलोवॉटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी वीजपुरवठा पुनजोडणीच्या वेळी प्रीपेड मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. अशा ग्राहकांचे पुनर्जीडणी शुल्क आणि सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

Sambhajinagar Recruitment News : संभाजीनगर महापालिका भरतीचा निकाल वादात; CCTV तपासणीत ५० उमेदवारांचे बिंग फुटले

Web Title: Msedcl abhay yojana 2026 27 electricity bill waiver sambhajinagar sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Electric

संबंधित बातम्या

Mahindra Earthshot Prize 2026: भारतीय मोबिलिटी क्षेत्राचा जागतिक डंका! महिंद्राला ‘अर्थशॉट प्राइज 2026’चा सन्मान
1

Mahindra Earthshot Prize 2026: भारतीय मोबिलिटी क्षेत्राचा जागतिक डंका! महिंद्राला ‘अर्थशॉट प्राइज 2026’चा सन्मान

Sambhajinagar Recruitment News : संभाजीनगर महापालिका भरतीचा निकाल वादात; CCTV तपासणीत ५० उमेदवारांचे बिंग फुटले
2

Sambhajinagar Recruitment News : संभाजीनगर महापालिका भरतीचा निकाल वादात; CCTV तपासणीत ५० उमेदवारांचे बिंग फुटले

Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा तरुणाचा प्रयत्न; 40 मिनिटांचा थरकाप
3

Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा तरुणाचा प्रयत्न; 40 मिनिटांचा थरकाप

Sambhajinagar News : वाळूजला स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग मोकळा? १२ ग्रामपंचायतींच्या एकत्रीकरणाची तयारी सुरू
4

Sambhajinagar News : वाळूजला स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग मोकळा? १२ ग्रामपंचायतींच्या एकत्रीकरणाची तयारी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.