Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: “नागरिकांना त्रास दिला तर गय करणार नाही…”, महापौरांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नगररचना आणि कर विभागात १०० दिवसांचा कृती आराखडा लागू. नागरिकांना विनाकारण त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर महापौर समीर राजूरकर करणार कारवाई.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 24, 2026 | 02:58 PM
महापौरांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा (Photo Credit- X)

महापौरांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • अडवणूक करणे थांबवा, नसता थेट कारवाई होणार
  • महापौर समीर राजूरकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नगररचना आणि मालमत्ता कर विभागात शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी महापौर समीर राजूरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बांधकाम परवानगी किंवा कर आकारणी प्रक्रियेत नागरिकांना अनावश्यक अडथळे आले तर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर, तातडीने कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

महापौरांनी नगररचना व मालमत्ता कर विभागाचा संयुक्त आढावा घेतला. बैठकीस उपमहापौर, आयुक्त जी. श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त विकास नवाळे, नगररचना उपसंचालक मनोज गर्ने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कामकाजातील विलंब, प्रलंबित संचिका आणि कर वसुली प्रक्रियेतील तक्रारी यावर सविस्तर चर्चा झाली.

महापौरांनी सांगितले की, महत्त्वाच्या विभागांत अपेक्षित बदल घडवण्यासाठी १०० दिवसांचा विशेष कृतीआराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात प्रकरणांचा वेळेत निपटारा, प्रलंबित संचिकांची छाननी, विभागीय देखरेखीची पुनर्रचना आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे यांचा समावेश आहे. ३० दिवसांनंतर प्रगतीचा आढावा घेतला जाणार असून अपेक्षित सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कारवाई होईल.

घरकुल बांधकामासाठी अर्ज करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी संचिका ठराविक मुदतीत मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले. नव्याने मंजूर विकास आराखड्यानंतर अर्जाची संख्या वाढली आहे. त्यामुळे निर्णयप्रक्रिया गतीमान करून विकासकामांना चालना देण्याचे आदेश महापौरांनी दिले. प्रकरणे प्रलंबित ठेवणे किंवा अनावश्यक कागदपत्रांची मागणी करणे सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Chhatrapati Sambhajinagar Weather: संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार; तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा

कर वसुलीमध्ये देणार पारदर्शकतेवर भर

मालमत्ता कर आकारणी आणि वसुली प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचे निर्देश देण्यात आले. कर निर्धारण करताना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे महापौरांनी बजावले. नागरिकांशी सन्मानाने वागण्यावरही त्यांनी भर दिला. सोसायटीनिहाय कर वसुलीची पद्धत सबविण्याबाबत अभ्यास करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मोठ्या थकबाकीदारांची अद्ययावत यादी तयार करून वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले.

१०० दिवसांचा विशेष कृती आराखडा लागू

महापालिकेच्या नगररचना आणि कर विभागात कार्यपद्धतीत सुधारणा घडवण्यासाठी १०० दिवसांची कृती योजना लागू करण्यात येणार आहे. प्रकरणांचा वेळेत निपटारा, प्रलंबित संचिकांची छाननी, जबाबदारी निश्चिती आणि विभागीय कामगिरीचे नियमित मूल्यमापन यावर भर राहणार आहे. दर ३० दिवसांनी प्रगतीचा आढावा घेऊन कामगिरीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.

छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत! जायकवाडीत वीज बिघाड, पंधरा दिवसांनंतरच स्थिती पूर्ववत होणार

Web Title: If citizens are disturbed we will not tolerate it mayor warns officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Mayor

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.