Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, अन्यथा…’, गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

छत्रपती संभाजीनगरमधील बंजारा आरक्षण मेळाव्यात गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. समितीचा अहवाल केंद्राकडे पाठवून तातडीने एसटी आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 14, 2026 | 03:00 PM
गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा (Photo Credit- X)

गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, अन्यथा…’
  • गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
  • वाचा सविस्तर बातमी…
छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी, गोर बंजारा समाजाला आरक्षणविषयी नेमलेल्या समितीकडून अहवाल घेऊन तो तात्काळ केंद्र सरकारला (Central Goverment) पाठवून लवकरात लवकर शिफारस करावी, आणि एसटी आरक्षण मिळविण्यासाठीची पावले उचलावी, अशी मागणी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी केली.

समाजाला एसटीतुन आरक्षण मिळावे यासाठी शहरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भविष्यात गोर बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मुलभूत हक्कासाठी तिव्र लढा उभारणार असल्याचेही प्रा. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात गोरबंजारा पारंपारीक निसर्गपूजा म्हणजे जळभोग लावून तसेच संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुहिक वाचनाने झाली. प्रास्ताविक प्रा. डॉ. दामोदर राठोड यांनी केले.


महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज हा आदिम सभ्यता जपणारा असून अनुसुचित जमातीच्या आरक्षणासाठी लागणारे सर्व निकष पुर्ण करत असून त्यांना एसटी आरक्षणाच्या सवलती लागू करावे या मागणीसाठी गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ५७ महामोर्चे गोर बंजारा समाजाच्या वतीने काढण्यात आले. अनेक युवकांनी आमरण उपोषण केले व ५ युवकांनी आपले प्राणाचे बलिदानही दिले, समृद्धी महामार्ग रोखला, तेव्हा कुठे सरकारने अनुसूचित जमातीचे आयोगासाठी अभ्यास समिती नेमली मात्र, सात महीने उलटूनही समितीने कोणताही अभ्यास चालू केला नाही. त्यामुळे गोर बंजारा आरक्षण कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत शहरात हा आरक्षण मेळावा घेतला असल्याचे चव्हाण म्हणाले.

Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला; बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक

गोरसेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा इशारा

भविष्यात एकजुटीने एसटी आरक्षणासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले. सुत्रसंचालन प्रा. रतनकुमार राठोड, कवी यशवंत पवार यांनी केले तर गोरसिकवाडीचे राष्ट्रीय हसाबी प्रकाश राठोड यांनी हिशोब मांडला. नितेश राठोड यांनी आभार मानले. या मेळाव्याला महाराष्ट्रातून गोरबंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, माजी आ. राजेश राठोड, कर्नाटक बिदर येथील उद्योजक जयसिंग राठोड, नांदेड येथील नायगाव शशिकला काशिनाथ राठोड, माजी आ. निलय नाईक, आरक्षणाच्या अभ्यासक प्रा. मोहन चव्हाण, पुणे येथील निवृत्त माहिती संचालक मोहन राठोड, परभणी येथील प्रा. डॉ. बबन पवार, कर्नाटकचे माजी न्यायाधीश सुभाषचंद्र राठोड यांच्यासह दिगंबर राठोड, सिम्पल राठोड, डॉ. अनिल राठोड, आकाशी जाधव, डॉ. अभय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या अभ्यास समितीकडून अहवाल घेऊन तो तात्काळ केंद्र सरकारला पाठवून लवकर एसटी आरक्षणासाठीची पावले उचलावी, अन्यथा भविष्यात रस्त्यावर उतरुन आरक्षणाचा लढा तीव्र करणार आणि आणि ते सरकारला परवडणार नाही, असा इशाराही प्रा. संदेश चव्हाण यांनी दिला.

FDA Raid: छत्रपती संभाजीनगर हादरले! तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे संशयास्पद तेल जप्त

Web Title: Gor sena president sandesh chavan warns cm devendra fadnavis over banjara samaj st reservation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Banjara community
  • Banjara Reservation
  • Chhatrapati Sambhajinagar
  • CM Devedra Fadnavis

संबंधित बातम्या

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…
1

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
2

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?
3

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल
4

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.