Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला; बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक

छत्रपती संभाजीनगरच्या २,७४० कोटींच्या पाणी योजनेतील तांत्रिक गोंधळामुळे नागरिकांना वाढीव पाणी मिळालेले नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ जुलैला मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 14, 2026 | 02:29 PM
पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला (Photo Credit- X)

पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात!
  • वाढीव पाणीपुरवठा रखडला
  • बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक
छत्रपती संभाजीनगर: शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनीतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. नव्या जलशुद्धीकरण केंद्रातील गळती, व्हॉल्व्ह बदलण्याचा वाद आणि पंप सुरू करण्यावरून निर्माण झालेल्या पेचामुळे नागरिकांना अपेक्षित वाढीव पाणी अद्याप मिळू शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली असून, बुधवारी दि.१५ जुलै रोजी मुंबईत दुपारी २.३० वाजता उच्चस्तरीय बैठक होणार आहे.

योजनेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी देण्याचे आदेश न्यायालयाने १२ जूनपासून लागू करण्यास सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात आठवडाभर उशिराने पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे सुरुवातीपासूनच या योजनेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच नक्षत्रवाडी येथील नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या स्लॅबला गळती लागली. ही बाब समोर आल्यानंतर २४ जूनपासून नाथसागर येथील पंप बंद करण्यात आले.

आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर अखेर पंप सुरू

कंत्राटदाराने गळतीची दुरुस्ती पूर्ण करून पंप पुन्हा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कळविले. गळतीची दुरुस्ती झाल्यानंतरही पंप सुरू होऊ शकले नाहीत. खराब झालेले व्हॉल्व्ह बदलल्याशिवाय पंप सुरू करणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली. नवीन व्हॉल्व्ह उपलब्ध होण्यासाठी वेळ लागणार असल्याने कंत्राटदाराने कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची लेखी हमी दिली.

बाबा फर्जनच्या जुन्या घराची झाडाझडती, मुलगा, युनियन पदाधिकारी अन् पत्नीची चौकशी; चौकशीत काय उघड झाले?

नागरिकांच्या अपेक्षांवर विरजण

तरीही पंप सुरू करण्याबाबत निर्णय होत नसल्याने वाद अधिकच चिघळला. स्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी थेट हस्तक्षेप केला. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेऊन दोन्ही बाजूंना स्पष्ट सूचना दिल्यानंतर अखेर पंप सुरू करण्यात आले. मात्र या सर्व प्रक्रियेमुळे वाढीव पाणीपुरवठ्याला पुन्हा विलंब झाला. नव्या योजनेतून शहराला नियमित आणि वाढीव पाणी मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र कामातील तांत्रिक अडचणी आणि संबंधित यंत्रणांमधील विसंवादामुळे ही अपेक्षा वारंवार भंगत आहे. परिणामी शहरवासीयांमध्ये नाराजी वाढत असून, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुख्यमंत्री घेणार आढावा

पाणी योजनेतील अडथळे दूर करून संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उच्चस्तरीय बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी २.३० वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह संबंधित विभागांकडून सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

FDA Raid: छत्रपती संभाजीनगर हादरले! तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे संशयास्पद तेल जप्त

Web Title: Water issue reaches the chief ministers desk augmented water supply stalled high level meeting in mumbai on wednesday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CM Devedra Fadnavis
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Pune Water Crisis: जलसंपदा विभाग म्हणतो, ४० टक्के कपात करा; पुण्यात ४० टक्के पाणीकपातीवरून राजकारण तापणार
1

Pune Water Crisis: जलसंपदा विभाग म्हणतो, ४० टक्के कपात करा; पुण्यात ४० टक्के पाणीकपातीवरून राजकारण तापणार

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य
2

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
3

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त
4

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.