Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी ८० टक्क्यांच्या उंबरठ्यावर! ५० हजार क्युसेकने पाण्याची आवक; मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली

Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी धरण ७९.७४ टक्के भरले असून ५० हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची ताजी स्थिती, जलपातळी आणि विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाची अपडेट वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 02, 2026 | 03:54 PM
तासगावच्या पाण्याचा ‘शब्द’ आता कृतीत; 11 महिन्यांत पाणी आणण्याचे महेश शिंदेंचे आश्वासन

तासगावच्या पाण्याचा ‘शब्द’ आता कृतीत; 11 महिन्यांत पाणी आणण्याचे महेश शिंदेंचे आश्वासन

Follow Us
Follow Us:
  • जायकवाडी ८० टक्क्यांच्या उंबरठ्यावर!
  • ५० हजार क्युसेकने पाण्याची आवक
  • मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली
Chhatrapati Sambhajinagar: नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी अर्थात नाथसागर धरणातील जलसाठ्यात झपाट्‌याने (Jayakwadi Dam Water Level) वाढ होत आहे. धरणाने ८० टक्क्यांच्या उंबरठ्यावर मजल मारली असून, शनिवार (दि. १ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता धरणात ७९.७४ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात ५० हजार १० क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

आवकेचा वेग कायम राहिल्यास येत्या आठवडाभरात नाथसागर पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्‌यासाठी अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे, या जलसाठ्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील सिंचन, औद्योगिक वापर आणि लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. गेल्या काही वर्षांत कमी पावसामुळे निर्माण झालेली अनिश्चितता यंदा निसर्गाने भरून काढल्याचे चित्र आहे.

सध्या धरणाच्या सांडव्यावरून कोणताही विसर्ग सुरू नसला तरी जलसाठा ९० टक्क्यांहून अधिक झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन विसर्गाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या नाथसागरातून माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून १,१०० क्युसेक, तर डाव्या कालव्यातून सिंचनासाठी ७०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. दोन्ही कालव्यांतून एकूण १,८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Chhatrapati Sambhajinagar: नागरिकांच्या जमिनी अन् गोपनीय डेटा धोक्यात? छत्रपती संभाजीनगरातील ‘या’ शासकीय कार्यालयात एजंटांचे राज्य

नाथसागर धरणातून सांडव्याद्वारे पाणी देण्यात आलेल्या नाहीत, धरणातील पाणीसाठा ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर तसेच वरच्या धरणांतून येणारी आवक व विसर्गाचा आढावा घेऊन परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. सध्या पाणी सोडण्याचा कोणताही प्रस्ताव अथवा आदेश नाही. – गणेश हसे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

गतवर्षी ९० टक्क्यानंतर विसर्ग सुरू झाला होता

३१ जुलै २०२५ रोजी नाथसागर धरणातील जलसाठा ९० टक्क्यांहून अधिक झाल्यानंतर सांडव्यावरून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. यंदा मात्र १ ऑगस्ट २०२६ रोजी धरणातील जलसाठा ७९.७४ टक्के असून, सध्या सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.

नाथसागरची स्थिती

जलसाठा : ७९.७४ टक्के
पूर्ण जलपातळी १५२२.०० फूट (४६३.९०६ मी.)
सध्याची जलपातळी १५१८.०६ फूट (४६२.७०५ मी.)
जिवंत पाणीसाठा १७३१.०५८ दलघमी (६१.१२ टीएमसी)
एकूण पाणीसाठा: २४६९.१६४ दलघमी (८७.१९ टीएमसी)

Karj Mafi e-KYC: कर्जमुक्तीच्या ई-केवायसीला अल्प प्रतिसाद! १.०५ लाख शेतकरी पात्र, मात्र केवायसी ३९ हजार शेतकऱ्यांचीच

Web Title: Jayakwadi dam water level crosses 79 percent 50000 cusec inflow marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Dam Water Level
  • Jayakwadi Dam
  • Marathwada

संबंधित बातम्या

Buldhana News: ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा; खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी
1

Buldhana News: ५१ प्रकल्पांत ६० टक्के जलसाठा; खरिपासोबतच रब्बीच्याही सिंचनाची काळजी

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
2

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
3

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.