
फोटो सौजन्य सोशल मिडिया
कांता ऊर्फ श्रीकांत बाबुराव कांबळे (६३, रा. संग्रामनगर, सातारा परिसर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. शहानूरवाडीतील जुना सर्वे क्रमांक ४०, नवीन भूमापन क्रमांक १६३१५, शीट क्रमांक १८२ या जमिनीवर गंगाराम गिरधारी उमाप हे संरक्षित कुळधारक होते. त्यांचे २९ जून १९९३ रोजी निधन झाले. त्यांनी हिराबाई सुदाम उमाप यांना दत्तक घेतले होते. हिराबाई यांचे १९ जुलै २०१९ रोजी निधन झाले. दिवाणी न्यायालयाने तक्रारदार कांबळे आणि त्यांची बहीण विमलबाई लक्ष्मण खरात ऊर्फ विमलबाई बाबुराव कांबळे यांना संबंधित मृत व्यक्तींचे वारस घोषित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गंगाराम उमाप यांनी ७ फेब्रुवारी १९९० रोजी मृत्युपत्र केले होते. त्यांनी कुळाचा राजीनामा किंवा हस्तांतरणाचा दस्तऐवज कोणालाही दिला नव्हता, असा दावा आहे. गंगाराम उमाप यांना इंग्रजी लिहिता-वाचता येत नसल्याचा फायदा घेऊन गंगाराम परदेशी याला मूळ कुळधारक म्हणून उभे करण्यात आल्याचा आरोप आहे.
किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणाचा खून; वाघोलीतील घटनेनं खळबळ
गुरुतेग बहाद्दर शैक्षणिक संस्थेसह अन्य व्यक्तींच्या माध्यमातून जमिनीचे व्यवहार झाले. खरेदीखत आणि महसुली फेरफारांच्या आधारे जमीन पुढे हस्तांतरित करण्यात आली. २० एप्रिल २०१६ रोजी फेरफार क्रमांक ८५५० अन्वये भूमापन अभिलेखात नोंद झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. मूळ कुळधारकाने राजीनामा दिला नसल्याने पुढील व्यवहार बेकायदेशीर असल्याचा दावा आहे.
बनावट अर्ज आणि स्टॅम्प पेपरवरील शपथपत्र तयार करून, १ ऑक्टोबर १९७३ रोजी फेरफार क्रमांक ६४ द्वारे मूळ कुळधारकाचे नाव सातबारा उताऱ्यातून कमी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. १९७५ मधील फेरफार क्रमांक ७१ तसेच १४ सप्टेंबर १९७९ रोजीचे फेरफार क्रमांक ११० व १११ यांचाही उल्लेख आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करूनही पोलिसांत गुन्हा दाखल न झाल्याने काबळे यानी न्यायालयात अर्ज केला, न्यायालयाच्या आदेशानुसार परदेशी वाव्याविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निरीक्षक अशोक मुदीराज करीत आहेत.
गंगाराम गिरधारीलाल ऊर्फ राजपूत ऊर्फ परदेशी, राजरतन गोपाल, प्रेम गोपाल, वंद्रेलाल पुरुषोत्तमलाल, चिमनलाल पुरुषोत्तमलाल, सुधाकर हरिभाऊ मुळे, मधुकर हरिभाऊ मुळे, मनमोहनसिंग करमसिंग ओबेरॉय, तरविदरसिंग महेंद्रसिंग चिल्लन, राजेंद्रसिंग तारासिंग जबिदा, रमेश भोधराम नागपाल, देवानंद नारायणराव कोटगीरे, नवीन हनुमानप्रसाद बगडिया आणि नितीन वेणुप्रसाद बगडिया यांची नावे तक्रारीत आहेत.
Crime News: ठाण्यात १७ वर्षीय मुलाची हत्या; मित्रांनी मृतदेह जाळून पोलीस चौकीजवळ पुरला…