
फोटो सौजन्य सोशल मिडिया
महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य, नगररचना आणि लेखा विभागांसह अतिरिक्त आयुक्तांच्या पदावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. अनेक महत्त्वाच्या पदांवर अधिकारी नसल्याने सध्याच्या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत. परिणामी, विभागीय कामकाजावर परिणाम होत असून काही महत्त्वाच्या कामांना विलंब होत असल्याचे चित्र आहे.
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा लवकरच विस्तार होणार; आठवडाभरात निविदाही काढली जाणार
स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत नुकतेच झालेल्या बैठकीत महापालिकेतील रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित केला. पदोन्नतीच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या महापौर समीर राजूरकर आणि महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी राज्य सरकारकडे प्रयत्न केले आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आचारसंहिता संपल्यानंतर पुढील आठ ते दहा दिवसांत यासंदर्भात हालचाली होण्याची अपेक्षा असल्याचे मकरिये यांनी सांगितले.
महापौर समीर राजूरकर आणि महापालिका आयुक्त अमोल येडरी यांनीही रिअधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी राज्य सरकारकडे प्रयत्न केले आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नियुक्त्या झाल्यास महापालिकेच्या विविध विभागांतील कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष नियुक्त्या कभी होणार आणि कोणत्या पदांवर अधिकसी मिळणार, हे शासनाच्या पुदील निर्णयानंतर स्पष्ट होईल.