Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maha E Seva Kendra News: शेंदूरवादा येथील महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे ठप्प; शेतकरी, नागरिकांची मोठी गैरसोय

केंद्र बंद असल्याने नागरिकांना १० ते २० किलोमीटर दूरच्या गावात जावे लागत आहे, परिणामी वेळ, पैसा आणि श्रम या तिन्ही स्तरांवर मोठा तोटा होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 27, 2025 | 04:11 PM
शेंदूरवादा येथील महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे ठप्प (Photo Credit - X)

शेंदूरवादा येथील महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे ठप्प (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी नाराज
  • गुरु धानोरा येथे महा ई-सेवा केंद्र ठप्प
  • आंदोलन करण्याचा थेट इशारा
Maha E Seva Kendra Shendurwada: शेंदूरवादा येथे शासनाने ग्रामीण भागात डिजिटल सेवांसाठी उभारलेले महा ई-सेवा केंद्र गुरु धानोरा येथे पूर्णपणे ठप्प झाले असून शेतकरी आणि ग्रामस्थांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. केंद्र बंद असल्याने नागरिकांना १० ते २० किलोमीटर दूरच्या गावात जावे लागत आहे, परिणामी वेळ, पैसा आणि श्रम या तिन्ही स्तरांवर मोठा तोटा होत आहे.

ग्रामपंचायतीकडे ई-सेवा केंद्र मंजूर असूनही ते प्रत्यक्षात अविकसित आणि बंदच असल्याचे चित्र आहे. नियुक्त ऑपरेटर साखर कारखान्यातील कामात व्यस्त असल्याने केंद्राचा कारभार पूर्णपणे ढाकता पडला आहे. ग्रामपंचायतीकडून या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढला आहे.

शेतकरी वर्गाने ताशेरे ओढले आहेत की, केंद्र गावात असताना बंद ठेवणे म्हणजे शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा थेट अपमान शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा थेट अपमान आहे. शासकीय सेवा मिळवण्यासाठी दिवस-रात्र धावपळ करावी लागते. जन्म-मृत्यू दाखले, सातबारा, नकाशे, जाती-निवासी प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक सरकारी कामांसाठी नागरिकांना बाहेरची वारी करावी लागत असल्याने ई-सेवा केंद्र असून अडचण नसून खोळंबा असे आहे.

हे देखील वाचा: CM Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana: “लाडकी बहीण योजना बंद….”, खुलताबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

पर्यायी ऑपरेटर का नाही?

गावातील डिजिटल सुविधा कागदावर असून प्रत्यक्षात शून्य आहे, अशी जनतेची तक्रार आहे.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला थेट जबाबदार धरत केंद्राचा पर्यायी ऑपरेटर का ठेवला नाही? गावातील सेवा बंद ठेवण्याचा अधिकार कोण दिला? असा सवाल उपस्थित केला आहे.

केंद्र तातडीने सुरू न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

ग्रामस्थांच्या मते, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे हा ऑपरेटर प्रत्यक्ष केंद्रावर न देता एका ठराविक दुकानदारास व्हॉट्सअॅपद्वारे पाठवतो.

दोघे मिळून नागरिकांकडून अतिरिक्त पैसे घेऊन संगनमताने व्यवहार करतात.

यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत असून ग्रामपंचायतीचा अधिकृत महसूल मोठ्या प्रमाणावर बडवला जात आहे.

हे देखील वाचा: Sambhajinagar : धक्कादायक! जेवणात आढळली पाल, समाज कल्याणच्या वसतिगृहातील 28 विद्यार्थ्यांना विषबाधा

Web Title: Maha e seva center at shendurwada completely shut down farmers citizens suffer huge inconvenience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • digital
  • farmer

संबंधित बातम्या

उच्च न्यायालयातील लढ्याला मोठे यश! आमदार राणा पाटलांमुळे शेतकऱ्यांना मिळणार ₹२२० कोटींचा पीकविमा; ऐन निवडणुकीत मोठा दिलासा
1

उच्च न्यायालयातील लढ्याला मोठे यश! आमदार राणा पाटलांमुळे शेतकऱ्यांना मिळणार ₹२२० कोटींचा पीकविमा; ऐन निवडणुकीत मोठा दिलासा

Chhatrapati Sambhajinagar Crime: बेदम मारहाण आणि चाकू हल्ला! व्यापाऱ्याला अडवून अडीच लाखांची रोकड आणि दुचाकी लंपास; अन्…
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: बेदम मारहाण आणि चाकू हल्ला! व्यापाऱ्याला अडवून अडीच लाखांची रोकड आणि दुचाकी लंपास; अन्…

पुरूषहो! कुटुंबनियोजनात आता तुमचाही वाटा, 4 डिसेंबरपर्यंत ‘पुरुष नसबंदी पंधरवडा’, गैरसमजाचे सावट होणार दूर
3

पुरूषहो! कुटुंबनियोजनात आता तुमचाही वाटा, 4 डिसेंबरपर्यंत ‘पुरुष नसबंदी पंधरवडा’, गैरसमजाचे सावट होणार दूर

CM Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana: “लाडकी बहीण योजना बंद….”, खुलताबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं
4

CM Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana: “लाडकी बहीण योजना बंद….”, खुलताबादमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.