Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीयोजनेत मोठे यश! जायकवाडीचे पाणी १८ किमीपर्यंत पोहोचले; १४ एप्रिलची ‘डेडलाईन’ गाठणार?

जायकवाडी धरणातून शहराकडे अतिरिक्त २०० एमएलडी पाणी आणण्यासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात असून, सोमवारी सुमारे १८.८ किमीपर्यंत पाणी यशस्वीरित्या आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 02, 2026 | 03:31 PM
छत्रपती संभाजीनगरच्या पाणीयोजनेत मोठे यश! जायकवाडीचे पाणी १८ किमीपर्यंत पोहोचले; १४ एप्रिलची ‘डेडलाईन’ गाठणार?
Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरच्या पाणीयोजनेत मोठे यश!
  • जायकवाडीचे पाणी १८ किमीपर्यंत पोहोचले
  • १४ एप्रिलची ‘डेडलाईन’ गाठणार?
छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीटंचाईवर दीर्घकालीन तोडगा म्हणून राबविण्यात येत असलेल्या योजनेत महत्त्वाची प्रगती झाली आहे. जायकवाडी धरणातून शहराकडे अतिरिक्त २०० एमएलडी पाणी आणण्यासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात असून, सोमवारी सुमारे १८.८ किमीपर्यंत पाणी यशस्वीरित्या आले. कौडगावपर्यंत आणण्यात जलवाहिनी स्वच्छ करण्यात आली असून, तपासणीदरम्यान कोणतीही गंभीर अडचण आढळली नसल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेकडून देण्यात आली.

२३ मार्चपासून जलवाहिनी स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. जायकवाडी धरणातील जॅकवेलपासून नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे ३८ किमी अंतरावर ही भव्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. बुधवारी दुपारी जॅकवेलवरील दोन्ही पंप सुरू करण्यात आले होते; मात्र ३७०० हॉर्सपॉवर क्षमतेतील एक पंप पंपाच्या साहाय्याने सायंकाळपर्यंत अचानक ट्रिप झाला. तरीही उर्वरित एका कौडगावपर्यंत पाणी पोहोचवण्यात यश आले. येथे बसविण्यात आलेल्या स्कोअर व्हॉल्व्हमधून दूषित पाणी बाहेर काढून जलवाहिनी स्वच्छ करण्यात आली. गुरुवारी दुपारपासून कौडगावपासून पुढील भागात पाणी सोडण्याची प्रक्रिया होणार आहे. नियोजनानुसार १४ एप्रिलपूर्वी सुरू नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या टप्प्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

बैठकीत कामांना गती देण्याचे दिले निर्देश

न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीने बुधवारी या योजनेचा आढावा घेता विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जलकुंभ उभारणीस गती देणे, प्रलंबित वसाहतींमध्ये नवीन जलवाहिन्या तातडीने टाकणे आणि नक्षत्रवाडी केंद्रातून शहरात पाणी लवकर पोहोचवण्यावर भर देण्यात आला.

Paithan News: पैठण तालुक्यात अवकाळीचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह गारपिटीने फळबागा उद्ध्वस्त; बळीराजा हवालदिल

निधी व परवानग्यांचे अडथळे कायम

कामकाजात अडथळे येत असल्याची कबुली जीव्हीपीआर कंपनीने बैठकीत दिली. निधी वेळेवर मिळत नसल्यामुळे कामांवर परिणाम होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदावे लागत असून, त्यासाठी आवश्यक परवानग्या मिळण्यात अडचणी येत आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही निधीअभावी विलंब होत असल्याची तक्रार करण्यात आली.

डेडलाईन गाठण्याचे लक्ष

पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय अडथळे असले, तरी चाचणी प्रक्रियेत झालेली प्रगती आशादायक मानली जात आहे. १४ एप्रिलचा डेडलाइन गाठण्यात प्रशासन यशस्वी ठरते का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Sambhajinagar Municipal Corporation Revenue: संभाजीनगर मनपाच्या तिजोरीत ४५० कोटींचा खडखडाट! वसुलीचा नवा विक्रम

Web Title: Major success in chhatrapati sambhajinagars water supply scheme jayakwadi water reaches up to 18 km

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Jayakwadi Dam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.