Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना वेग; उपकेंद्रांची दुरुस्ती सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळ्यापूर्वी महावितरणने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि उपकेंद्रांच्या देखभालीमुळे वीजपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 12, 2026 | 04:22 PM
पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना वेग

पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना वेग

Follow Us
Follow Us:

 

  • पावसाळ्यात वीज गुल होणार नाही!
  • महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना वेग
  • उपकेंद्रांची दुरुस्ती सुरू
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलामधील वीज उपकेंद्रांतील व वीजवाहिन्यांवरील यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे हाती घेण्यात आली आहेत.

पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉप-अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सुलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉप-अप या व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.

शुक्रवार, १० एप्रिल रोजी विविध ३३ केव्ही उपकेंद्रांत व त्यावरील वाहिन्यांवर नियोजित देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली. दरम्यान, देखभाल दुरुस्तीपूर्वी ग्राहकांना पूर्वसूचनाही दिली जात असल्याचे महावितरणने म्हटले असून महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर

Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीच्या लग्नावरून वाद; 18 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वडिलांवर गुन्हा दाखल

‘एसएमएस’द्वारे संबंधित वीजग्राहकांना पूर्वनियोजित वीज बंद होण्याबाबत कळवण्यात येत असल्याचे महावितरणने म्हटले आहे. सोबतच बाधित होणाऱ्या क्षेत्रात पर्यायी अन्य वीजयंत्रणेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे.

महापालिकेची परवानगी घेऊनच छाटणी करा

खाजगी किंवा विविध संस्था मालकीच्या जागेतील झाडांच्या मोठ्या फांद्या वादळ व मुसळधार पावसामुळे कुंपणाबाहेरील वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. त्याचा अंदाज घेऊन वीजवाहिन्यांना संभाव्य धोका असणाऱ्या झाडांच्या मोठ्या फाद्यांची संबंधितांनी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेऊन किंवा त्यांच्या साह्याने छाटणी करावी. यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे महावितरणकडून कळवण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar: पाणीपुरवठ्यात ‘गॅप’ कायमच! उन्हाळ्यात ६ ते १० दिवसांनी पाणी येण्याची भीती, नागरिकांत संताप

Web Title: Msedcl pre monsoon maintenance chhatrapati sambhajinagar electricity supply update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • mahavitaran

संबंधित बातम्या

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी
1

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

Farmer Protest: सरकारची कर्जमाफी म्हणजे डोळ्यात धूळफेक… शेतकरी संघटना आक्रमक, शासन निर्णयाची केली होळी
2

Farmer Protest: सरकारची कर्जमाफी म्हणजे डोळ्यात धूळफेक… शेतकरी संघटना आक्रमक, शासन निर्णयाची केली होळी

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार
3

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं; ‘मी बायकोला कायमचं संपवलं’ म्हणत…
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं; ‘मी बायकोला कायमचं संपवलं’ म्हणत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.