Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळाच्या ताफ्यात येणार ८०० स्वमालकीच्या नव्या बसेस

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ८०० स्वमालकीच्या नव्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेसच्या खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 03:04 PM
एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! (Photo Credit- X)

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!
  • महामंडळाच्या ताफ्यात येणार ८०० स्वमालकीच्या नव्या बसेस
  • प्रक्रिया अंतिम टप्प्यात
छत्रपती संभाजीनगर राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ८०० स्वमालकीच्या नव्या बसेस समाविष्ट करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असताना, त्या चालवण्यासाठी आजही मोठ्या प्रमाणावर कंत्राटी चालकांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कायमस्वरूपी भरती न करता तात्पुरत्या उपायांवर सेवा चालवणे हे स्पष्ट प्रशासकीय अपयश असल्याची तीव्र प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

राज्यभरात टप्याटप्याने नव्या बसेस खरेदी करून जुन्या व जीर्ण झालेल्या बसेस सेवेतून काढून टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातच ८०० स्व-मालकीच्या बसेसची निविदा व प्रशासकीय प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून लवकरच त्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, वाहनसंख्या वाढत असताना त्यानुसार चालक व वाहकांची कायमस्वरूपी भरती न झाल्याने संपूर्ण सेवा व्यवस्थेवर ताण वाढण्याची चिन्हे आहेत.

सध्या अनेक आगारांमध्ये चालक व वाहक पदांची मोठी रिक्तता असून, वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा, दीर्घकालीन सेवा हमी व प्रशासकीय संरक्षण नसल्याने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी बदल होत असून, त्यामुळे मार्गनियोजन व प्रवासी सेवा विस्कळीत होत आहे.

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेला ई-केवायसीचा फटका! लाखो महिलांचे हप्ते रखडले; नेमकं कारण काय?

मनुष्यबळ व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष नको !

दरम्यान, शासनाकडून सेवा विस्तार व आधुनिकीकरणाचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मनुष्यबळ व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्यास नव्या बसेसचा अपेक्षित लाभ प्रवाशांपर्यंत पोहोचणार नाही, असा इशाराही तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे वाहन खरेदीबरोचरच तातडीने नियमित चालक व वाहक भरतीची प्रक्रिया सुरू करणे हाच एसटी सेवा सावरण्याचा खरा मार्ग असल्याचे स्पष्ट होत आहे.
कंत्राटी चालकांवर अवलंबून राहणे ही चूक वाहकांची कमतरता ही समस्या अधिक तीव्र स्वरूपाची बनली असून, काही ठिकाणी चालकांवरच तिकीट वितरणाची जबाबदारी येत असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून प्रवाशांच्या दृष्टीनेही ही बाब चिंताजनक ठरत आहे. नियमित भरती न करता केवळ कंत्राटी व्यवस्थेवर भर देणे म्हणजे व्यवस्थेतील मूलभूत त्रुटींवर तात्पुरते मलमपट्टी करण्यासारखे असल्याची टीका होत आहे.

कर्मचारी संघटनांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, एसटीसारख्या सार्वजनिक संस्थेत कंत्राटी चालकांवर अवलंबून राहणे ही धोरणात्मक चूक असून ती प्रशासकीय अपयशाचेच द्योतक आहे. नव्या बसेस खरेदीवर कोट्यवधीचा खर्च होत असताना, त्याच वेळी स्थायी व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत ठोस निर्णय न होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Smart City: स्मार्ट सिटीचे प्रकल्प मनपाच्या गळ्यात! सफारी पार्क आणि नाट्यगृहासाठी छत्रपती संभाजीनगरकरांना अजून प्रतीक्षा

Web Title: Msrtc to buy 800 new self owned st buses process in final stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Maharashtra ST Buses
  • st bus news

संबंधित बातम्या

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय
1

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
2

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
3

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
4

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.