Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: कायम नियुक्तीचा प्रस्ताव धूळखात सुरक्षा यंत्रणेवर ताण, ६१ माजी सैनिक कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सुरक्षा विभागात १०४ पदे रिक्त असून गेल्या साडेपाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या ६१ माजी सैनिकांना कायम करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 03, 2026 | 01:44 PM
Chhatrapati Sambhajinagar (Photo Credit- X)

Chhatrapati Sambhajinagar (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • कायम नियुक्तीचा प्रस्ताव धूळखात
  • सुरक्षा यंत्रणेवर ताण
  • ६१ माजी सैनिक कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): छ. संभाजीनगर महापालिकेच्या सुरक्षा विभागात मंजूर पदांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. सुरक्षा रक्षक व वॉचमन संवर्गातील तब्बल १०४ पदे रिक्त असून, या जागांवर गेल्या साडेपाच वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ६१ माजी सैनिकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र नगरविकास विभागाकडून अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने हा प्रस्ताव रखडला आहे.

महापालिकेच्या मंजूर आकृतिबंधानुसार सुरक्षा विभागात वर्ग-३ मधील सुरक्षा रक्षकांची ५५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ चार पदांवर कर्मचारी कार्यरत असून सरळसेवेची १० आणि पदोन्नतीची ४१ अशी एकूण ५१ पदे रिक्त आहेत. वर्ग-४ मधील स्मशानभूमी रक्षक व चौकीदार (वॉचमन) संवर्गात ११८ पदांपैकी ६५ पदे भरलेली असून ५३ पदे अद्याप रिक्त आहेत. अशा प्रकारे दोन्ही संवर्गातील १७३ मंजूर पदांपैकी केवळ ६९ पदे भरलेली असून तब्बल १०४ पदांचा अनुशेष कायम आहे.

या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर २०१८ पासून मनुष्यबळ पुरवठादार संस्थेमार्फत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ६१ माजी सैनिकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार नियमित केल्यास महापालिकेवर दरमहा सुमारे १५ लाख ५० हजार रुपयांचा अतिरिक्त वेतनभार येणार असल्याचा अंदाज आहे.

८.७४ कोटींची दंडात्मक वसुली

महापालिकेत नागरी मित्र पथक म्हणून कार्यरत असलेल्या माजी सैनिकांनी ऑक्टोबर २०१८ पासून विविध कारवायांमधून महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ८ कोटी ७४ लाख रुपयांची दंडात्मक वसुली जमा केली आहे. कोविड-१९ महामारीच्या काळातही त्यांनी दिवस-रात्र सेवा बजावत शहरातील विविध ठिकाणी सुरक्षा आणि नियंत्रणाची जबाबदारी पार पाडली होती.

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!

६० माजी सैनिकांच्या निवेदनानंतर शासनाकडे प्रस्ताव

कायम नियुक्तीची मागणी करत ६० माजी सैनिकांनी महापालिकेकडे निवेदन सादर केले होते. त्याची दखल घेत तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना विशेष बाब म्हणून या माजी सैनिकांना सुरक्षा विभागातील रिक्त पदांवर सामावून घेण्याची विनंती केली. सुरक्षा व्यवस्थेतील मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यासाठी शासनाने मान्यता द्यावी, अशी शिफारसही करण्यात आली. मात्र हा प्रस्ताव अद्याप शासन स्तरावर प्रलंबित आहे.

रिक्त पदांचे चित्र

सुरक्षा रक्षक (वर्ग-३) मंजूर पदे : ५५
भरलेली पदे : ४
रिक्त पदे : ५१
वॉचमन व स्मशानभूमी रक्षक (वर्ग-४)
मंजूर पदे : ११८
भरलेली पदे ६५
रिक्त पदे ५३
एकूण मंजूर पदे : १७३
एकूण भरलेली पदे : ६९
एकूण रिक्त पदे : १०४

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

Web Title: Municipal corporation 104 security posts vacant ex servicemen proposal pending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

छ. संभाजीनगर महापालिकेचा मास्टर प्लॅन! शहरातील ‘या’ १२ प्रमुख मार्गांवर आता दिवस-रात्र फिरणार अतिक्रमणविरोधी गस्ती पथके
1

छ. संभाजीनगर महापालिकेचा मास्टर प्लॅन! शहरातील ‘या’ १२ प्रमुख मार्गांवर आता दिवस-रात्र फिरणार अतिक्रमणविरोधी गस्ती पथके

संभाजीनगर हादरलं! भर चौकात व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार, मदतीची विनंती केली; पण…
2

संभाजीनगर हादरलं! भर चौकात व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार, मदतीची विनंती केली; पण…

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!
3

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या
4

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.