Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fuel Crisis News: शहरात इंधनाचा ‘भडका’! पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; गॅससाठी रांगा आणि महामार्गावर वाहनांची चाके थांबली

कोरोना काळात 'लॉकडाऊन' लागला होता, तशीच अवस्था पुन्हा कोणत्याही क्षणी उभी राहू शकते. शहरासह ग्रामीण भागात पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी गॅसचा तुटवडा होऊन जनजीवन विस्कळीत व्हायला सुरूवात झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 27, 2026 | 03:12 PM
शहरात इंधनाचा 'भडका'! पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक

शहरात इंधनाचा 'भडका'! पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक

Follow Us
Follow Us:

 

  • शहरात इंधनाचा ‘भडका’!
  • पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक
  • गॅससाठी रांगा आणि महामार्गावर वाहनांची चाके थांबली
विलास इंगळे। नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर/जालना: अमेरिका इस्त्राइल आणि इराण युद्धामुळे उध्दभवलेली गॅस टंचाई नंतर दोन दिवसांपासून पेट्रोलचा ‘भडका’ उडाल्याने पंप चालकांना ‘नोस्टॉक’ च्या फलकाचा आधार घ्यावा लागला आहे. कोरोना काळात ‘लॉकडाऊन’ लागला होता, तशीच अवस्था पुन्हा कोणत्याही क्षणी उभी राहू शकते. शहरासह ग्रामीण भागात पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी गॅसचा तुटवडा होऊन जनजीवन विस्कळीत व्हायला सुरूवात झाली आहे. सध्या जालना-औरंगाबाद येथील पेट्रोल पंप बंद झाल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. स्वयंपाकाचा गॅस मिळत नसल्याने सिलिंडरसाठी रांगा लागत आहेत.

‘नो स्टॉक’चा बोर्ड लावून पंप बंद

दोन दिवसांपासून पेट्रोल पंप बंद असल्याने काही पंपावर वादाची ‘ठिणगी’ पडून हाणामाऱ्या होत आहेत. तूर्त पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून अशीच स्थिती राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो, असे बोलले जात आहे. जिल्हा प्रशासन कितीही टंचाई नसल्याचा दावा करीत असले तरी गर्दी अन् रांगा वेगळेच चिञ दर्शवत आहे. बुधवारी सकाळपासूनच शहरातील अनेक पेट्रोल पंपावर रांगा लागल्या होत्या. काही पेट्रोल पंप चालकांनी तर ‘नो स्टॉक’चा बोर्ड लावून पंप बंद केले. रांगेत थांबलेल्या दुचाकीचालकांना काही प्रमाणात पेट्रोल मिळाले. मात्र, रात्री जवळपास सर्वच पेट्रोल पंप बंद झाल्याने शहरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती.

पंपासमोर ट्रेलर आडवे

जालना-औरंगाबाद महामार्गावरील पेट्रोल पंप बुधवार रात्रीपासूनच बंद झालेले पंप गुरुवारीही सुरू झाले नाहीत. पेट्रोलच नसल्यामुळे या महामार्गावरील पेट्रोल पंपावर अनेक अवजड वाहनांसह (ट्रक) चारचाकी वाहने अडकून पडली आहेत. अनेक पेट्रोल पंपचालकांनी ही अवजड वाहनेच पेट्रोल पंपाच्या प्रवेशद्वारावर लावून पेट्रोल पंप बंद केले आहेत. वाहनधारक पेट्रोल पंप चालकांशी पेट्रोलसाठी हुज्जत घालत असल्याने चालकांनी अशी युक्ती केली आहे. बुधवारी रात्री पेट्रोल पंपचालकांनी वाद घालण्यापेक्षा लाईट बंद करून अंधारात राहणे पसंत केले.

LPG Gas Crisis: गॅस टंचाईमुळे पुन्हा येणार ‘रॉकेल युग’! शासनाचा मोठा निर्णय, पण परवानाधारकांमध्ये निरुत्साह; वाचा काय आहे कारण?

महामार्गावर कर्फ्यू

शहरात पेट्रोल मिळत नसल्याने औरंगाबादहून जालन्याला जाणाऱ्यांची व जालन्याहून औरंगाबादला येणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. शहराबाहेर पेट्रोल मिळेल म्हणून अनेकांनी ४० ते ५० किमी पर्यंत जात पेट्रोल मिळवण्याची कसरत केली. एवढे करूनही पेट्रोल न मिळाल्याने अनेक वाहनधारकांना वाटेतूनच घरी परतावे लागले. गुरुवारी पंप होतील या आशेने पहाटेपासून वाहनधारक पंपावर गर्दी करुन होते.

सामान्यांचा रोष

विशेष म्हणजे बुधवारी जिल्हा प्रशासनान कुठेही पेट्रोल डिझेल व एलपीजी गॅसची कमतरता नाही. नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले होते. असे असताना अचानक रात्रीतून पेट्रोल पंप बंद होतात, यावर प्रशासन काहीच उपाययोजना करत नाही, त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेवरून संशय व्यक्त होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar News: गरिबांचा आठवडी ‘मॉल’ बंद! वाहतूककोंडी टाळण्यासाठी निर्णय; पर्यायी व्यवस्था करून देणार

Web Title: No stock boards at petrol pumps queues for gas and vehicles ground to a halt on highways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • LPG Gas Crisis
  • Petrol and diesel
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल
1

Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
3

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
4

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.