(फोटो सौजन्य: istock)
या अभ्यासात WHO आणि IARC यांनी कॅन्सर होण्याची अशी ३० प्रमुख कारणे पाहिली आहेत, जी आपण आपल्या सवयी बदलून किंवा योग्य नियंत्रण ठेवून कमी करू शकतो. यामध्ये तंबाखू आणि मद्यपान, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता, वायू प्रदूषण, अतिनील किरणे आणि कर्करोगास कारणीभूत नऊ संसर्गांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन अहवालानुसार, २०२२ मध्ये कर्करोगाच्या नवीन प्रकरणांपैकी सुमारे ३७ टक्के, किंवा ७.७ दशलक्ष प्रकरणे, अशा कारणांशी संबंधित होती जी निरोगी जीवनशैली आणि निरोगी सवयींद्वारे रोखता आली असती.
WHO च्या या नव्या अभ्यासात, १८५ देशांमधील आणि ३६ प्रकारच्या कर्करोगाच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. तज्ञांचे मते, तंबाखू हे जगभरातील कर्करोगाचे प्रमुख कारण आहे, जे नवीन कर्करोगाच्या प्रकरणांपैकी सुमारे १५ टक्के आहे. यानंतर संसर्गाचा याच १० टक्के वाटा तर मद्यपानाचा ८ टक्के… यावरुनच हे स्पष्ट होते की, कर्करोग हा केवळ अनुवांशिक आजार नाही तर तो जीवनशैली आणि पर्यावरणाशी संबंधित एक मोठा धोका आहे.
भारताविषयी बोलणे केले तर, पुरुष आणि महिला दोघांमध्ये अंदाजे ३७% कर्करोगाच्या घटना अशा आहेत ज्या टाळता येऊ शकतात. भारतात कर्करोगाचे प्रमुख कारण संसर्ग असून देशात अंदाजे १३.४ टक्के कर्करोगाच्या घटना संसर्गामुळे होत असल्याचे वृत्त आहे. याशिवाय, तंबाखूचे सेवन देखील कर्करोगाच्या समस्येस आमंत्रण देण्यास प्रमुख भूमिका बजावत असते. अहवालानुसार, १०.५ टक्के कर्करोगाच्या घटनांमध्ये धूम्रपान हे कारण मूळ ठरले आहे. अहवालानुसार, धूररहित तंबाखू आणि सुपारिचे सेवन ५% कर्करोगाच्या प्रकरणांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्करोगाचा धोका कसा टाळता येतो
भारतातील सुमारे ४४.७% कर्करोगाची प्रकरणे अशी कारणांमुळे होतात, जी योग्य काळजी घेतल्यास वेळीच टाळता येऊ शकतात.
कर्करोगाची प्रमुख लक्षणे






