Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद! ४५५ दात्यांचा सहभाग संत निरंकारी मिशनतर्फे सामाजिक बांधिलकीचे दर्शन

संत निरंकारी मिशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मानव एकता दिनानिमित्त पार पडलेल्या शिबिरात ४५५ जणांनी रक्तदान केले, त्यात ४२० पुरुष व ३५ महिलांचा समावेश होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 26, 2026 | 07:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सामाजिक बांधिलकी जपत संत निरंकारी मिशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मानव एकता दिनानिमित्त सिंधी कॉलनीतील सत्संग भवन येथे पार पडलेल्या या शिबिरात तब्बल ४५५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून मानवतेच्या कार्यात मोलाचा हातभार लावला. विशेष म्हणजे या शिबिरात ४२० पुरुष आणि ३५ महिलांनी रक्तदान केले.

जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन! उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध लेखकांच्या पुस्तकांशी झाली ओळख

या उपक्रमाचे उद्घाटन माजी विभागीय प्रमुख कन्हैयालाल डेबरा, जिल्हा संयोजक डी. जी. दळवी, क्षेत्रीय सेवादल प्रमुख विजय बोडखे आणि अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शासकीय रुग्णालयाच्या विभागीय रक्तसंकलन केंद्राचे डॉ. भारतकुमार सोनवणे यांचीही उपस्थिती लाभली. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराला औपचारिक सुरुवात झाली.

या प्रसंगी बोलताना कन्हैयालाल डेबरा यांनी सांगितले की, संत निरंकारी मिशनकडून समाजोपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्यामध्ये रक्तदान शिबिराचा विशेष समावेश असून वर्षातून किमान दोन वेळा अशा शिबिरांचे आयोजन केले जाते. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून मानवतेच्या यज्ञात प्रत्येकाने आपला वाटा उचलावा,” असे आवाहन त्यांनी केले.

सकाळपासून सुरू झालेल्या या शिबिरात अवघ्या आठ तासांत ४५५ जणांनी रक्तदान केले. मात्र काही वैद्यकीय कारणांमुळे २६ पुरुष आणि ५४ महिलांना रक्तदान करता आले नाही. तरीही मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतल्यामुळे शिबिर यशस्वी ठरले. रक्तदात्यांच्या सोयीसाठी नाश्ता आणि ज्यूसची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

Sangali News : शिष्यवृत्ती परिक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; चौथीसाठी 141 तर सातवीसाठी 104केंद्रे

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुमारे २०० सेवादल सदस्यांनी परिश्रम घेतले. निरंकारी मंडळात एकूण २५० महिला-पुरुष सेवादल सदस्य कार्यरत असून त्यांनी शिस्तबद्ध आणि समन्वयाने संपूर्ण कार्यक्रम पार पाडला. शिबिरादरम्यान आरोग्य नियमांचे पालन करत रक्तसंकलन प्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पडली.

या उपक्रमातून समाजात रक्तदानाबाबत जागरूकता वाढवण्यास मोठी मदत झाली असून, नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कार्याला आणखी बळ मिळाले आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे समाजसेवेचा ध्यास कायम ठेवणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

Web Title: Overwhelming response to blood donation camp 455 donors participate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ
2

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.