Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Accident: पिकअप-दुचाकीचा भीषण अपघात! एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. विवाहमांडवा–चौंडाळा रोडवर दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. आठवडी बाजार करून घरी परतताना चव्हाण कुटुंबाच्या दुचाकीला पिकअपने जोरदार धडक दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 22, 2026 | 10:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पैठण तालुक्यात दुचाकी-पिकअपच्या धडकेत चार जणांचा मृत्यू.
  • मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एका चिमुकल्याचा समावेश.
  • पाचोड पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकी आणि पिकअप वाहनाची भीषण धडक झाली आहे. या दांडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना पैठण तालुक्यातील विवाहमांडवा–चौंडाळा रोडवर घडली आहे.

कसा झाला अपघात?

पाचोड येथून आठवडी बाजार करून खंडाळा येथील पारधी वस्तीकडे चव्हाण कुटुंब परतत होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार दंडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन महिला, एक पुरुष आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Navi Mumbai: कोकेन-हायड्रोपोनिक गांजा तस्करी प्रकरणातील सराईत ड्रग माफिया NCBच्या जाळ्यात; PIT-NDPS अंतर्गत अटक

मृतांची नावे

या अपघातातील मृतांची नावे समोर आली आहे. या अपघातात सिद्धार्थ चव्हाण (वय 30 वर्ष), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय 27), आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (वय 5) व संजना अभिषेक चव्हाण (वय 22 वर्ष) या चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे संपूर्ण खंडाळा परिसरावर शोककळा पसरली आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डी-मार्टसमोरील परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील म्हसवे गावाच्या हद्दीत पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीकडे प्रवासी घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ट्रॅव्हलरने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, टेम्पो ट्रॅव्हलरच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताच्या वेळी वाहनातील बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने त्यांना धडकेचा मोठा फटका बसला. या दुर्घटनेत स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ (बापू) कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.जखमींची नावे मात्र समजू शकली नाही. अपघातानंतर महामार्गावर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी घटनास्थळी तत्काळ पोहोचून बचावकार्य हाती घेतले. जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

Beed Crime: किरकोळ कारणावरून तरुणाला संपवलं, गावकऱ्यांचा रास्ता रोको

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे झाला?

    Ans: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील विवाहमांडवा–चौंडाळा रोडवर अपघात झाला.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans:

Web Title: Chhatrapati sambhajinagar accident horrific collision between a pickup truck and a two wheeler 4 members of the same family killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
4

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.