Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये…; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजल्यानंतर मित्राजवळ सोडले. मित्राने तिला हॉटेलमध्ये नेत अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार संभाजीनगरमध्ये घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 22, 2026 | 02:24 PM
पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये...; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये...; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजल्यानंतर मित्राजवळ सोडले. मित्राने तिला हॉटेलमध्ये नेत अत्याचार केला. त्याचे व्हिडीओ तयार करून धमकावत तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. विशेष म्हणजे या प्रकरणात दीरासह अन्य एका व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आला आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागात विवाहीतेवर अत्याचार करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी पती, दिर, सासू, सासरा, मामा, शेख रिजवान (रा. जिन्सी), समीर बेग, रिजवान बेग (रा. कैसर पार्क, गुलाब टॉवर, नारेगाव) या सात जणांवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपी शेख रिजवान याला शनिवारी (२० जून) अटक केली असून त्याला न्यायालयाने २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. २० वर्षीय विवाहीत पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडितेचे

१२ वीचे शिक्षण झाले आहे. पीडितेच्या पतीने त्याचा मित्र शेख रिजवान याला नोट्स लिहिण्याच्या बहाण्याने पीडितेचा मोबाइल क्रमांक दिला होता. त्यानंतर रिजवान वारंवार फोन करून पीडितेला मी तुला खूप लाईक करतो, तु माझ्याशी बोल म्हणत त्रास देत होता. याबाबत पीडितेने पती व सासरच्या मंडळींना महिती दिली होती. त्यावर त्यांनी पिडतेलाच त्याच्याबद्दल वाईट बोलू नको असे बजावले. ६ एप्रिल २०२५ रोजी पीडितेचा पती तिला नातेवाईकांकडे घेऊन जात असताना त्याने तिला कोल्ड्रिग पाजले. ते पिल्यानंतर तिला चक्कर व उलट्यांचा त्रास सुरू झाला. पतीने कामाचे कारण सांगत मित्र रिजवानला पीडितेला घरी सोडण्यास सांगितले. रिजवान तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार केला.

व्हिडिओ दाखवून केली ब्लॅकमेलिंग

पीडिता शुद्धीवर आल्यावर तिने घडलेल्या प्रकाराबाबत रिजवानला जाब विचारला असता त्याने तुझ्या पतीला या सर्व प्रकाराबाबत माहिती असल्याचे सांगत अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिने पतीकडे विचारणा केली असता, त्याने मीच त्याला तुझ्याकडे पाठवले होते, तो जस म्हणतो तस कर असे तो म्हणाल्याचे फिर्यादीत नमुद आहे. त्यानंतर रिजवान पीडितेला वारंवार फोन करुन तु माझ्या सोबत बोलली नाहीस तर ते व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर टाकून व्हायरल करेल, अशी धमक देत होता.

दिरासह अन्य एकाने केले अत्याचार

एप्रिल २०२५ मध्ये घडलेला प्रकार पीडितेने दिराला सांगितला असता, त्याने मदतीचे आश्वासन देत तिला नारेगावातील समीर बेग याच्या घरी नेले. तेथे जबरदस्तीने गोळ्या देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर दीराने वारंवार अत्याचार केले, तर समीर बेग यानेही तिचे लैंगिक शोषण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पतीच्या मामाने अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप तिने केला आहे.

पतीवरच पोक्सोचा गुन्हा

यापूर्वी पीडितीने तिच्या पतीविरुद्ध तक्रार दिल्यामुळे पोलिसांनी पोक्साचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर तो तु माझ्यावर केलेला पोक्सोच्या केसमुळे माझा खूप खर्च झालेला आहे. तु तुझ्या आई वडिलांकडून पाच लाख रुपये घे, नाही तर तुला नांदवणार नाही असे म्हणत तिचा छळ करत होता.

हे सुद्धा वाचा : कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल

सात जणांवर गुन्हा दाखल

पीडितेची प्रकृती खालावत चालल्याने पीडितेच्या आई- वडिलांनी तीला विचारणा केली. माञ पीडिता काही उत्तर देत नसल्याने त्यांनी पीडितेला शपथ घातली. त्यानंतर पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An outrageous incident involving the molestation of a woman has occurred in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.