Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! ‘इन्स्टाग्राम रील्स’साठी नियम मोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवून इन्स्टाग्राम रील्स बनवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल. दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 02, 2026 | 09:12 PM
जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! (Photo Credit- Ai)

जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! (Photo Credit- Ai)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात!
  • ‘इन्स्टाग्राम रील्स’साठी नियम मोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
जायकवाडी धरणाचा नाथसागर जलाशय परिसर सुरक्षेच्या कारणास्तव ‘नो ड्रोन झोन’ म्हणून घोषित करण्यात आलेला असतानाही नियमांचे उल्लंघन करून ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणावर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

दहशतवाद विरोधी शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, एका इसमाने पैठण येथील नाथसागर जलाशय परिसरात बेकायदेशीररीत्या ड्रोन उडवून चित्रीकरण केले असून त्या दृश्यांपासून तयार केलेल्या ‘रील्स’ सोशल मीडियावर प्रसारित केल्या आहेत. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे व त्यांच्या पथकाने संबंधित व्यक्तीच्या इन्स्टाग्राम खात्याची तपासणी केली.

तपासादरम्यान मनोज राजेंद्र देहाडे (२६, रा. पडेगाव) याने १५ मार्च २०२६ रोजी आपल्या ‘धुरंधर बाईक रायडर’ या ग्रुपसोबत नाथसागर येथे जाऊन अनधिकृतपणे ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याचे उघड झाले. नाथसागर जलाशय व त्याभोवतीचा पाच किलोमीटरचा परिसर हा नागरी विमान वाहतूक महासंचालनालय तसेच महाराष्ट्र राज्याच्या अपर पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार ‘रेड झोन’ अर्थात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.

E-Bus Project Delay: स्मार्ट सिटीचा ‘बोंबाबोंब’! ई-बस प्रकल्पाचा अक्षरशः खेळखंडोबा; तीन वर्षांपासून केवळ आश्वासनांचा पाऊस

या परिसरात ‘नो ड्रोन झोन’चे फलक लावलेले असतानाही कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता चित्रीकरण करण्यात आले. सदर प्रकरणात संबंधिताने जिल्हाधिकारी कार्यालय अथवा पोलिस विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. मनोज राजेंद्र देहाडे याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, ड्रोन अधिनियम २०२१ चा नियम २२ तसेच वायुमान अधिनियम १९३४ च्या कलम १० अन्वये पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, उपनिरीक्षक खंडागळे, सहाय्यक फौजदार विक्रम देशमुख, जमादार अविनाश बोर्डे, संजय घुगे, श्रीमंत भालेराव, राजेंद्र डकले व गणेश घोरपडे यांनी केली असून पुढील तपास पैठण पोलिस ठाणे करीत आहे.

नो ड्रोन झोनचे उल्लंघन ठरते गंभीर गुन्हा

महत्त्वाची धरणे, शासकीय इमारती व संवेदनशील ठिकाणे ही ‘नो ड्रोन झोन’ अंतर्गत येतात. अशा ठिकाणी विनापरवाना ड्रोन उडवणे हा गंभीर गुन्हा असून नागरिकांनी तसेच हौशी छायाचित्रकारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीयोजनेत मोठे यश! जायकवाडीचे पाणी १८ किमीपर्यंत पोहोचले; १४ एप्रिलची ‘डेडलाईन’ गाठणार?

Web Title: Paithan jayakwadi dam no drone zone violation police case instagram reels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Jayakwadi Dam

संबंधित बातम्या

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले
1

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त
2

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे ‘भोंदूबाबा’ कनेक्शन उघड! पतसंस्थेतील खात्यातून ४० ते ५० कोटींचे संशयास्पद व्यवहार
3

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे ‘भोंदूबाबा’ कनेक्शन उघड! पतसंस्थेतील खात्यातून ४० ते ५० कोटींचे संशयास्पद व्यवहार

E-Bus Project Delay: स्मार्ट सिटीचा ‘बोंबाबोंब’! ई-बस प्रकल्पाचा अक्षरशः खेळखंडोबा; तीन वर्षांपासून केवळ आश्वासनांचा पाऊस
4

E-Bus Project Delay: स्मार्ट सिटीचा ‘बोंबाबोंब’! ई-बस प्रकल्पाचा अक्षरशः खेळखंडोबा; तीन वर्षांपासून केवळ आश्वासनांचा पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.