Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E-Bus Project Delay: स्मार्ट सिटीचा ‘बोंबाबोंब’! ई-बस प्रकल्पाचा अक्षरशः खेळखंडोबा; तीन वर्षांपासून केवळ आश्वासनांचा पाऊस

शहराचा वेगाने वाढणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक अत्यंत अपुरी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार किमान हजार बसांची आवश्यकता असताना सध्या अवघ्या शंभर डिझेल बस उपलब्ध आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 02, 2026 | 03:45 PM
स्मार्ट सिटीचा 'बोंबाबोंब'! ई-बस प्रकल्पाचा अक्षरशः खेळखंडोबा

स्मार्ट सिटीचा 'बोंबाबोंब'! ई-बस प्रकल्पाचा अक्षरशः खेळखंडोबा

Follow Us
Follow Us:

 

  • स्मार्ट सिटीचा ‘बोंबाबोंब’!
  • ई-बस प्रकल्पाचा अक्षरशः खेळखंडोबा
  • तीन वर्षांपासून केवळ आश्वासनांचा पाऊस
छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा बळकट करण्यासाठी प्रस्तावित ३४ एसी इलेट्रिक बस प्रकल्पाचा अक्षरशः खेळखंडोबा झाल्याचे समोर आले आहे. जून २०२३ पासून सातत्याने बदलणाऱ्या डेडलाईननंतर आता मे २०२६ पर्यंत बस उपलब्ध होतील, असे नवे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र तीन वर्षांच्या विलंबानंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

शहराचा वेगाने वाढणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक अत्यंत अपुरी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार किमान हजार बसांची आवश्यकता असताना सध्या अवघ्या शंभर डिझेल बस उपलब्ध आहेत. त्यापैकीही फक्त सुमारे ऐंशी बसच नियमित धावत आहेत. परिणामी नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून वाहतूक कोंडी आणि प्रदूषण दोन्ही वाढत आहे. अशा परिस्थितीत ३४ एसी इलेक्ट्रक बस हा प्रकल्प शहरासाठी दिलासा ठरणार होता; मात्र तोच आता अनिश्चिततेच्या गर्तेत अडकला आहे. आम्ही पर्यावरण प्रेमी या विविध संस्थांच्या मंचाने या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. १५ मागण्या मांडत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर माहिती अधिकाराचा मार्ग अवलंबावा लागला. रूपेश कलंत्री यांनी दाखल केलेल्या अर्ज आणि त्यानंतरच्या अपीलमधूनच या प्रकल्पातील अनेक त्रुटी आणि विलंबाची खरी कारणे उघडकीस आली.

चार नोटीस तरीही कंपनीवर कारवाई नाही

स्मार्ट सिटी प्रशासनाने बस पुरवठादार कंपनीला एक-दोन नव्हे तर चार वेळा नोटिसा बजावल्या. प्रत्येक नोटीसमध्ये काम वेळेत पूर्ण न केल्यास दंड, बैंक गॅरंटी जप्त करणे, करार रद्द करणे आणि काळ्या यादीत टाकण्याचे इशारे देण्यात आले. मात्र हे सर्व इशारे केवळ कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही.

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीयोजनेत मोठे यश! जायकवाडीचे पाणी १८ किमीपर्यंत पोहोचले; १४ एप्रिलची ‘डेडलाईन’ गाठणार?

नमुना बसच ठरली तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट

१ मे २०२५ रोजी सादर करण्यात आलेली नमुना बसच तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. ही बस वारंवार बंद पडत असल्याने तिच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. नमुना स्तरावरच अशी परिस्थिती असल्याने पुढे येणाऱ्या सर्व बसांचा दर्जा कसा असेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

उशिराची तीन मुख्य कारणे

या प्रकल्पाच्या रखडण्यामागे तीन प्रमुख कारणे पुढे आली आहेत. ई-बससाठी आवश्यक असलेले आगार उभारण्यात झालेला विलंब, पुरेशा विजेच्या उपलब्धतेचा अभाव आणि पुरवठादार कंपनीकडून सातत्याने होत असलेली टोलवाटोलवी – या सर्व कारणांनी प्रकल्पाला मोठा फटका बसला.

जबाबदार कोण?

इतका मोठा विलंब, सततच्या नोटिसा आणि उघड झालेल्या त्रुटी असूनही अद्याप कोणावरही ठोस जबाबदारी निश्चित केली नाही. प्रशासनाने इशारे देण्यापलीकडे कोणतीही निर्णायक पावले उचलली नसल्याने प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. मे २०२६ ही नवी मुदत जाहीर करण्यात आली आहे.

Paithan News: पैठण तालुक्यात अवकाळीचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह गारपिटीने फळबागा उद्ध्वस्त; बळीराजा हवालदिल

Web Title: Smart city e bus project delay chhatrapati sambhajinagar news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • bus
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Smart City

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.