Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Water Crisis: धरण उशाला अन् कोरड घशाला…. वीजपुरवठा खंडित, शहरात पुन्हा जलसंकट

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा १० तास बंद राहिला. मुबलक पाणी असूनही नागरिकांना ८ दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 24, 2025 | 02:35 PM
वीजपुरवठा खंडित, शहरात पुन्हा जलसंकट (Photo Credit- X)

वीजपुरवठा खंडित, शहरात पुन्हा जलसंकट (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • संभाजीनगरकरांची पाण्यासाठी वणवण
  • १० तास वीज गुल
  • पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत
छत्रपती संभाजीनगर : ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी काहीशी विदारक स्थिती सध्या छत्रपती संभाजीनगरकरांची झाली आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही नियोजनाच्या अभावामुळे शहरवासीयांना थेंब-थेंब पाण्यासाठी तब्बल आठ-आठ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. कधी जलवाहिनी फुटणे, तर कधी महावितरणचा खोळंबा यामुळे पाणी वितरणाची साखळी पूर्णपणे कोलमडली आहे.

११ तास पाणी उपसा बंद; शहरावर पाणीटंचाईचे सावट

मंगळवारी पहाटे फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला. ७०० आणि ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांचा पुरवठा सव्वा चार तास, तर मुख्य १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा पुरवठा तब्बल १० तास ४० मिनिटे बंद राहिला. यामुळे संपूर्ण शहराचे पाण्याचे वेळापत्रक आता एका दिवसाने पुढे सरकले आहे.

नेमका बिघाड काय झाला?

पहाटे ४:२५ वाजता वीज पुरवठा अचानक बंद झाला. कर्मचाऱ्यांनी तातडीने तपासणी केली. सकाळी ६:०० वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला, पण महावितरणच्या २२० केव्ही फिडरमध्ये ‘ट्रिपिंग’ झाल्याने पुन्हा अंधार झाला.सकाळी ८:३५ वाजता: अखेर बिडकीन फिडरवरून वीज घेऊन उपसा सुरू करण्यात आला.

हे देखील वाचा: कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा! जिल्हा रुग्णालयात ‘मोफत किमोथेरपी’ सुरू; खासगीतील महागड्या उपचारांतून सुटका

संताप: ऐन निवडणुकीत पाणीबाणी!

शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण असताना आठवडाभरात दोनवेळा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. धरणात पाणी असूनही ते घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला वारंवार अपयश येत असल्याने “आम्हाला मुबलक पाणी कधी मिळणार?” असा सवाल संभाजीनगरकर विचारत आहेत.

विस्कळीत पाणीपुरवठ्याची कारणे:

१. महावितरणचा लहरीपणा: वारंवार वीज पुरवठा खंडित होणे.

२. जुन्या जलवाहिन्या: वारंवार गळती आणि पाईप फुटण्याचे प्रकार.

३. नियोजनाचा अभाव: जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यातील समन्वयाची कमतरता.

“पाणी असूनही ते मिळत नसेल, तर या यंत्रणेचा काय उपयोग? आठ दिवस पाणी येत नाही आणि आले तरी ते फक्त तासाभरासाठी. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.” — एक संतापलेला नागरिक.

हे देखील वाचा: मनपा निवडणूकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज; ‘या’ १० केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर! वेबकास्टिंग आणि सीसीटीव्हीचा पहारा

Web Title: Power supply disrupted the city faces a water crisis again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Power cut
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke on Amit Shah: ‘अमित शाह यांच्या आदेशावरूनच…’, अभिजीत दीपके यांचा खळबळजनक आरोप, तर केंद्र सरकारवरही टीकेचे बाण
1

Abhijeet Dipke on Amit Shah: ‘अमित शाह यांच्या आदेशावरूनच…’, अभिजीत दीपके यांचा खळबळजनक आरोप, तर केंद्र सरकारवरही टीकेचे बाण

Chhatrapati Sambhajinagar: नागरिकांच्या जमिनी अन् गोपनीय डेटा धोक्यात? छत्रपती संभाजीनगरातील ‘या’ शासकीय कार्यालयात एजंटांचे राज्य
2

Chhatrapati Sambhajinagar: नागरिकांच्या जमिनी अन् गोपनीय डेटा धोक्यात? छत्रपती संभाजीनगरातील ‘या’ शासकीय कार्यालयात एजंटांचे राज्य

Karj Mafi e-KYC: कर्जमुक्तीच्या ई-केवायसीला अल्प प्रतिसाद! १.०५ लाख शेतकरी पात्र, मात्र केवायसी ३९ हजार शेतकऱ्यांचीच
3

Karj Mafi e-KYC: कर्जमुक्तीच्या ई-केवायसीला अल्प प्रतिसाद! १.०५ लाख शेतकरी पात्र, मात्र केवायसी ३९ हजार शेतकऱ्यांचीच

तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर
4

तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.