Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : पाणीटंचाईचे संकट गडद; लवकरच कपात ;तोतलाडोह आणि कन्हानमधील जलसाठा निम्म्यावर

Nagpur News : नागपूर शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले असून तोतलाडोह आणि कन्हान येथील जलसाठ्यात घट होत आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार १० टक्के पाणीकपातीची शक्यता आहे. कपात लागू झाल्यास दररोज ७४ एमएलडी पाणी कमी मिळणार असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आढावा बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 31, 2026 | 04:42 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • कमी पाऊस आणि अल निनोचा परिणाम
  • दररोज २५९ एमएलडी पाण्याची नासाडी
  • १० टक्के कपातीने ७४ एमएलडीची घट
Nagpur News : शहरातील पाणीपुरवठ्याचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून नागपूरकरांना लवकरच पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तोतलाडोह आणि कन्हान येथील जलसाठ्यात सातत्याने घट होत असल्याने महापालिकेने पाणीपुरवठ्यात कपात करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

राज्य सरकारने उपलब्ध पाण्यापैकी १० टक्के पाणी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यातही १० टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आढावा बैठकीनंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

कमी पाऊस आणि अल निनोचा परिणाम

यंदाच्या पावसाळ्यात नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ६४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. कमी पावसामुळे तोतलाडोह आणि कन्हान येथील जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील पाणी उपलब्धतेबाबत चिंता वाढली आहे.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने उपलब्ध पाण्यापैकी १० टक्के पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू केले आहे.

Nagpur News : बांधकाम सुरु असताना गणेशपेठेत क्रेन कोसळली; दोघांचा मृत्यू

दररोज २५९ एमएलडी पाण्याची नासाडी

नागपूर शहराला तोतलाडोह आणि कन्हान नदीतून दररोज सुमारे ७४० एमएलडी कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यातील जवळपास ३५ टक्के म्हणजेच २५९ एमएलडी पाणी गळती, चोरी, अवैध नळजोडण्या आणि बिलिंगमधील त्रुटींमुळे वाया जात असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेकडून जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि अवैध नळजोडण्या नियमित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपाययोजनांतून दररोज ५० एमएलडी पाण्याची बचत होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त

१० टक्के कपातीने ७४ एमएलडीची घट

शहरात १० टक्के पाणीकपात लागू झाल्यास दररोजच्या पाणीपुरवठ्यात ७४ एमएलडीची घट होणार आहे. आधीच मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असताना ही कपात नागरिकांसाठी अडचणीची ठरू शकते. महापौर नीता ठाकरे यांनीही पाणीकपातीचा निर्णय आता अनिवार्य झाल्याचे स्पष्ट केले आहे.

शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे परिस्थितीचा आढावा घेणार असून कपातीचे नेमके प्रमाण निश्चित करण्यासाठी सविस्तर अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागपूरकरांचे लक्ष आता महापालिका आणि राज्य सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

Web Title: Nagpur news water crisis 10 percent water supply cut totladoh kanhan reservoir cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • Water Crisis

संबंधित बातम्या

World News : रशिया युक्रेनच्या युद्धाची शिक्षा डॉल्फिनला ;काळ्या समुद्रातील १ लाख २० हजारांहून अधिक डॉल्फिनचा मृत्यू
1

World News : रशिया युक्रेनच्या युद्धाची शिक्षा डॉल्फिनला ;काळ्या समुद्रातील १ लाख २० हजारांहून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

CLAT 2027: लॉ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा
2

CLAT 2027: लॉ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल!  ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार
3

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल! ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार

Nagpur News :बांधकाम सुरु असताना गणेशपेठेत क्रेन कोसळली; दोघांचा मृत्यू
4

Nagpur News :बांधकाम सुरु असताना गणेशपेठेत क्रेन कोसळली; दोघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.