Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘स्कॅनर’ घोटाळ्यावरून खळबळ; मुख्य अभियंता अतुल चव्हाणांच्या बदलीसाठी सरपंच मंगेश साबळे आक्रमक

सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित स्कॅनर घोटाळ्यावरून सरपंच मंगेश साबळे यांनी मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन केले. या घोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी चव्हाणांच्या बदलीची मागणी करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 23, 2026 | 02:29 PM
सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘स्कॅनर’ घोटाळ्यावरून खळबळ; मुख्य अभियंता अतुल चव्हाणांच्या बदलीसाठी सरपंच मंगेश साबळे आक्रमक
Follow Us
Follow Us:

 

  • सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘स्कॅनर’ घोटाळ्यावरून खळबळ
  • मुख्य अभियंता अतुल चव्हाणांच्या बदलीसाठी सरपंच मंगेश साबळे आक्रमक
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित स्कॅनर घोटाळ्यावरून हा विभाग सिंचन विभागानंतर जास्त चर्चेत आला आहे. फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती सा.बां. विभागाचे मुख्य अभियंता असून त्यांच्या आदेशानुसार हा घोटाळा दाबला जात आहे. चौकशी होईपर्यंत चव्हाण यांची मराठवाडा बाहेर बदली करावी, ही मागणी करीत सरपंच मंगेश साबळे यांनी करीत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांना दिलेल्या निवेदनात सरपंच मंगेश साबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित क्यूआर कोड स्कॅनर घोटाळयात मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा मोठा हात आहे. त्यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या फुलंब्री तालुक्याच्या आमदार असून पदाचा गैरवापर करुन त्यांच्या विरुध्द आंदोलन व तक्रारी करणाऱ्यांना धमक्या देणे आणि दहशत निर्माण करण्याचे काम केले जात आहे.

सामान्यांच्या बाजूने आवाज उचलणाऱ्यांचे हे लोक आवाज दाबवण्याचा प्रयत्न करीत आहे. माजी विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी कथित स्कॅनर घोटाळचा तपशील देत चौकशीची मागणी केली होती. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्या पुराव्याची होळी करणार आहोत.

Chhatrapati Sambhajinagar Crime: घरात घुसून महिलेने पिस्तूल आणि चाकूने केली महिलेची हत्या; काय घडलं नेमकं?

सीई ऑफिसचा वापर भाजपच्या बैठकांसाठी

फुलंब्री मतदारसंघातील सर्व कामांचा निकाल लावण्यासाठी तालुक्यातील नेत्यांना भेटीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बोलावले जात आहे. दररोज नेत्यांची रांग अन् बैठकांचे सत्र मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या कार्यालयात पार पाडण्याचे काम केले जात आहे. विभागातील दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर तालुक्यातील भाजप नेते कसे येतात अन कधी बाहेर जातात याचा तपशील उघड होईल, असा आरोपही साबळे यांनी लावला आहे. मुख्य अभियंता कार्यालय हे मराठवाड्यातील सा.बां. विभागाच्या कामासाठी असले तरी हे कार्यालय भाजपसाठी वापरले जात आहे. पत्नी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आमदारांचा स्टीकर असलेली मोठी कार कार्यालयात उभी केली जात होती. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते वाहन कार्यालयात लावणे बंद झाले होते. असे असले तरी मतदारसंघातील नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरूच असून त्याची देखील चौकशी होणे गरजेचे असल्याचे साबळे यांनी म्हटले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवतरले ‘बर्लिन’! ज्योतीनगरमध्ये शहरातल्या पहिल्या अत्याधुनिक प्ले पार्कचे लोकार्पण

Web Title: Public works department scanner scam protest against chief engineer atul chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
2

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.