Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: महापालिकेत ‘हायव्होल्टेज’ ड्रामा, एमआयएम प्रदेशाध्यक्ष जलील यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून वाद

छत्रपती संभाजीनगर मनपाच्या सभेत माजी खासदार इम्तियाज जलील यांचा 'शक्ती कपूर' असा उल्लेख केल्याने मोठा गदारोळ झाला. महापौरांनी असंसदीय शब्द इतिवृत्तातून वगळण्याचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 21, 2026 | 02:41 PM
महापालिकेत 'हायव्होल्टेज' ड्रामा

महापालिकेत 'हायव्होल्टेज' ड्रामा

Follow Us
Follow Us:

 

  • महापालिकेत ‘हायव्होल्टेज’ ड्रामा
  • एमआयएम प्रदेशाध्यक्ष जलील यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून वाद
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शक्ती कपूर या उल्लेखाने राजकीय ठिणगी पडली. एमआयएम प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ अक्षरशः हाय व्होल्टचा गदारोळ पाहायला मिळाला. महापौर समीर राजूरकर यांनी हस्तक्षेप करत असंसदीय शब्द इतिवृत्तातून वगळण्याचे आदेश दिले.

सोमवारी पार पडलेल्या सभेला महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, मनपा आयुक्त अमोल येडगे, नगर सचिव नंदकिशोर भोंबे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले तसेच कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांचे वडील डी. एस. गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्या व्हायरल व्हिडिओचा मुद्दा उपस्थित झाला. जुन्या शहरात कोणतेही काम करण्यासाठी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाची आवश्यकता असल्याचा आशय त्या व्हिडिओत असल्याचे सांगत सत्ताधारी भाजप आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी टीका केली.

चर्चेदरम्यान वंचितचे नगरसेवक अफसर खान यांनी जलील यांचा उल्लेख ‘शक्ती कपूर’ असा करताच एमआयएमचे नगरसेवक संतप्त झाले. अनेक सदस्य एकाचवेळी बोलू लागल्याने सभागृहाचे वातावरण ढवळून निघाले. काही काळ सभागृह मच्छी बाजारासारखे झाल्याचे चित्र होते. राजगौरव वानखेडे यांनी संबंधित वक्तव्याबद्दल माफीची मागणी केली, तर प्रमोद राठोड यांनी सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेलचे दर ठरले, पण ग्राहकांमध्ये संताप! ६३ रुपयांच्या दरामुळे रेशनकार्डधारकांचा खिसा रिकामा होणार

लोकप्रतिनिधींचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका काही सदस्यांनी मांडली. वातावरण चिघळत असल्याचे पाहून महापौर समीर राजूरकर यांनी कडक शब्दांत सर्वांना सुनावले. आपण हजारो नागरिकांचे प्रतिनिधी आहोत. मंत्री, खासदार, आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधींविषयी बोलताना भान ठेवले पाहिजे, असे सांगत त्यांनी असंसदीय शब्द इतिवृत्तातून वगळण्याचे आदेश दिले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरु झाले.

प्रस्ताव कुठे अडकला? राठोडांचा सवाल

प्रमोद राठोड यांनी सभेत प्रशासनावर थेट प्रश्न उपस्थित केला. यापूर्वीही अशा प्रकारची वक्तव्ये झाली असताना ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला. चुकीच्या वर्तनावर स्पष्ट आणि तातडीची कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रशिक्षणवर्ग घ्या : जंजाळ

उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी महापौरांना प्रथम नागरिक संबोधले जाते, याची आठवण करून देत सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याची गरज अधोरेखित कैली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेनुसार चालतो, याची जाणीव ठेवावी, असे सांगत सदस्यांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली.

अक्षय्य तृतीयेचा ‘सुवर्ण’ मुहूर्त! बाजारपेठेत ४०० कोटींची विक्रमी उलाढाल; वाहन आणि सराफा बाजारात मोठी तेजी

Web Title: Sambhajinagar municipal corporation meeting controversy imtiaz jaleel remark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • AIMIM
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.