
फोटो सौजन्य सोशल मिडिया
पोलीस तपासामध्ये चौकशी केली असता, मृत मुलीचा आयफोन सापडला , हा आयफोन आरोपी गणेश शंकर शेंडगे याने आपल्या प्रेयसीला दिला होता. यानेच मृत तरुणीला सतत मानसिक त्रास दिला आणि लग्न करण्यासाठी दबाव टाकून तो सतत तिची ब्लॅकमेलिंग करत होता.असे पोलीस तपासात उघड झाले.
गणेश शंकर शेंडगेअसं आरोपीचं नाव आहे.तर हनवंता शेषराव सिरामे हे मुलीचे वडिल असून त्यांनी या प्रकरणी मुलीच्या वडील श्रीरामे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, 14 मे 2026 रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी कामावरून घरी परतले असता त्यांना घराची कडी बाहेरून लावलेली आढळली.
त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता त्यांची मुलगी हिने ओढणीच्या साहाय्याने फॅनला गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. तत्काळ तिला खाली उतरवून उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं; मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.
आरोपीच्या या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळूनच आपल्या मुलीनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली,असा गंभीर आरोप मृत तरुणीचे वडील हनवंता शेषराव सिरामे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केला आहे.
या प्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 351(2) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे करत आहेत.
Crime News: अडीच लाखांची बोली लावून आणली नवरी; तिसऱ्याच दिवशी जेवणातून विष देण्याचा प्रयत्न…