Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट

FDA Hits Vaijapur : छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर येथील नॅचरल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करताना गंभीर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले.एफएसएसएआय निकषांमध्ये ९४ पैकी केवळ १५ गुण मिळाल्याने डेअरीचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 06, 2026 | 08:46 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • प्लास्टिकच्या कॅनचा वापर केला जात होता 
  • ४३ हजारांचा साठा केला नष्ट  
  • ९४ पैकी फक्त १५ गुण!
FDA Hits Vaijapur : छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या वैजापूरच्या नॅचरल डेअरीत अन्न सुरक्षा नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीत उघड झाले. यशवंत कॉलनी, रामगिरी नगर (प्लॉट क्र. १) येथील या डेअरीवर २ ऑक्टोचर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या पथकाने अचानक धाड टाकली. पांटमधील अस्वच्छता आणि – नियमभंगाची स्थिती पाहता डेअरीला एफएसएसएआय निकांमध्ये ९४ पैकी केवळ १५ गुण मिळाले. त्यानंतर अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

तपासणीदरम्यान प्लांटची फरशी अनेक ठिकाणी तुटलेली, दरवाजे उघडे आणि खिडक्यांना कीटक प्रतिबंधक जाळ्या नसल्याचे आढळले. प्लांटमध्ये वापरले जाणारे पाणी पिण्यायोग्य असल्याचा मानकानुसार चाचणी अहवालही उपलब्ध नव्हता. विशेष म्हणजे, डेअरीत येणाऱ्या कच्या दुधाची प्राथमिक तपासणी केली जात नसल्याचे समोर आले. दूध ५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा अथवा तापमान दर्शक नव्हता.

प्लास्टिकच्या कॅनचा वापर केला जात होता

दुधातील भेसळ तपासणीच्या नोंदीही आढळल्या नाहीत. दूध साठवणुकीसाठी स्टेनलेस स्टीलच्या टाक्यांचा वापर अपेक्षित असताना प्लास्टिकच्या कॅनचा वापर केला जात होता. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत नसणे, उपकरणांच्या स्वच्छतेत्त्या नोंदी नसणे आणि कीटक नियंत्रणाची योग्य अंमलबजावणी न होणे, या त्रुटीही तपासणीत समोर आल्या. दूध हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे अॅप्रन, हातमोजे आणि डोक्यावरील टोपी नव्हती. वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव असतानाच कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले नसल्याचेशी समोर आले.

अन्न सुरक्षा (रक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुग्ध व्यावसायिकांवर यापुढेही प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबतीत कठोर कारवाई केली जाईल, असे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी स्पष्ट केले.

Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी

४३ हजारांचा साठा केला नष्ट

या कारवाईत ५९ किलो पनीर। १८,८८० रुपये), ११ किलों क्रीम (४.४०० रुपये) आणि २८ किलो तूप (१९,६०० रुपये) असा एकूण ४२ हजार ८८० रुपयांचा दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.

९४ पैकी फक्त १५ गुण!

नॅचरल डेअरीला एकूण ९४ पैकी केवळ १५ गुण मिळाले, प्लांटची स्वच्छता, पाण्याची गुणवता, कच्या दुधाची तपासणी, तापमान नियंत्रण, भेसळ तपासणीच्या नोंदी, दूध सातवणूक, ईटीपी, कीटक नियंत्रण आणि कर्मचा-यांची वैद्यांकेतक स्वकता अशा अनेक मूलभूत बाबीमध्ये त्रुटी आढळल्याने डेअरी ‘नॉन-कम्प्लायन्स’ ठरली.

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देण्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश

Web Title: Fda action natural dairy vaijapur food safety violations sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • FDA
  • FDA Raid
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात ट्विस्ट! चौकशी बंद करण्यासाठी संस्थाचालकांची धावपळ
1

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात ट्विस्ट! चौकशी बंद करण्यासाठी संस्थाचालकांची धावपळ

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
2

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित

Food Scam:भारतात नेस्लेच्या ‘लो-फॅट डेअरी व्हाईटनर’चा नमुना ‘असुरक्षित’? आढळला; नियामकाची माहिती.
3

Food Scam:भारतात नेस्लेच्या ‘लो-फॅट डेअरी व्हाईटनर’चा नमुना ‘असुरक्षित’? आढळला; नियामकाची माहिती.

Farmers Are Distressed : पाण्याअभावी नाचनवेल-पिशोर परिसरातील पिके सुकली; बळीराजा चिंतातूर आणि आक्रोश
4

Farmers Are Distressed : पाण्याअभावी नाचनवेल-पिशोर परिसरातील पिके सुकली; बळीराजा चिंतातूर आणि आक्रोश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.