Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची ‘गुढी’ उभारणार कोण? अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड २० मार्चला होणार आहे. भाजपला बहुमतासाठी ५ सदस्यांची गरज असून, राष्ट्रवादी-शिवसेना युतीने सदस्यांची नाकेबंदी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 19, 2026 | 08:51 PM
सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची 'गुढी' उभारणार कोण? (Photo Credit - X)

सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची 'गुढी' उभारणार कोण? (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची ‘गुढी’ उभारणार कोण?
  • अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
सातारा दिनांक 19 प्रतिनिधी: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी होणार असून त्या दृष्टीने साताऱ्यात महायुतीमध्ये कोणते दोन घटक पक्ष सत्तेची गुढी उभारणार हा उत्सुकतेचा विषय आहे. भारतीय जनता पार्टी 33 चे संख्या बळ गाठणार का का त्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार या विषयी राजकीय वर्तुळात विश्लेषण सुरूझाले आह. शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट होत आहे

जिल्हा परिषदेत भाजपला सत्तावीस राष्ट्रवादी काँग्रेसला 20 तर शिवसेना शिंदे गटाला 15 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना एक अपक्ष एक काँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे .भारतीय जनता पार्टीने अध्यक्ष भाजपचाच व्हावा अशी आग्रही भूमिका घेतली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संख्याबळाचे गणित जुळवत अध्यक्ष आमचाच होणार असा दावा केला आहे दुसरीकडे पालकमंत्री शंभूराजे देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाचे सर्व सदस्य यापूर्वी सहलीला गेले आहेत कोणताही दगाफटका होणार नाही याची शेवटच्या क्षणापर्यंत काळजी घेतली जात आहे .जिल्हा परिषद निवडणुका होऊन आता एक महिना उलटत आला तरी अध्यक्ष पदाचा प्रश्न सुटलेला नाही .जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीला जास्त जागा मिळाल्या तरी त्या बहुमताला पुरेश्या नाहीत .फलटण येथे झालेल्या राजकीय घडामोडी पाहता राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गट सावध झाले आहेत .भाजपचे संख्याबळ 28 असून त्यांना आणखी पाच सदस्यांची गरज आहे.

Karad News: KYC न केल्यास पेन्शन बंद, कराडमधील ७११ लाभार्थ्यांना अंतिम इशारा; ३० मार्चपर्यंत आधार प्रमाणीकरण अनिवार्य

गुढीपाडव्याचा सण साजरा झाल्यानंतर शुक्रवार दिनांक 20 रोजी निवडीच्या निमित्ताने सत्तेची गुढी उभारली जाणार आहे. ती गुढी भाजपची की शिवसेना राष्ट्रवादीची यावरून रस्सीखेच सुरू आहे. सहलीवर गेलेल्या सर्व सदस्यांना त्यांच्या पक्षाने व्हीप बजावला असून थेट निवडीच्या वेळीच त्यांचे सातारा आगमन होणार आहे. ऑपरेशन लोटस च्या भीतीने सर्व सदस्यांची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात कडे कोट राजकीय ग्रामीणमध्ये सर्व सदस्य मतदानासाठी आणले जाणार आहेत.

भारतीय जनता पार्टीचेराजकीय धुरंदर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांची राजकीय खेळी काय असणार याची अद्यापही कोणाला खबरबात नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सदस्यांवर आपला जागता पहारा ठेवला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील राजकीय गुढीचा सस्पेन्स अजूनही अध्यक्ष पदाच्या निमित्ताने कायम आहे.

Satara Crime: प्राध्यापकाकडून विद्यार्थीनीला अश्लील मेसेज; शरीरसुखाची मागणी, परिसरात संताप

Web Title: Satara zila parishad president election 2026 updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • political news
  • Satara
  • Satara News
  • ZP Election

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
2

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
3

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
4

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.