Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढला उन्हाचा कडाका; प्रशासनाने उचलले ‘हे’ महत्त्वाचे पाऊल

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमान ४१ अंशाच्या वर पोहोचले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 21, 2026 | 02:53 PM
उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात मार्च ते जून या कालावधीत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन जिल्हाभरात 53 उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमान ४१ अंशाच्या वर पोहोचले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. अशावेळी उष्माघाताची शक्यता अधिक वाढते. यामुळे पुढील धोके लक्षात घेता जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरातील ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

कोळसा खाणींमुळे वाढले प्रदूषण ! नागरिकांचा श्वास गुदमरतोय; धुळीवर नियंत्रणासाठी हवी ठोस उपाययोजना

दरम्यान, उष्माघात टाळण्यासाठी आणि लक्षणे दिसल्यास तातडीने काय करावे, याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये शेतात किंवा इतर कष्टाची मजुरीची कामे प्रदीर्घ काळ करणे. कारखान्यातील बॉयलर रूम किंवा जास्त तापमान असलेल्या खोलीत काम करणे. अंगाला घट्ट बसणाऱ्या कपड्यांचा वापर करणे. सतत वाढत्या तापमानाशी थेट संपर्क येणे यामुळे उष्माघाताचा धोका अधिक बळावतो.

कष्टाची कामे तापमान कमी असताना करावीत

कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तापमान कमी असताना करावीत. जास्त उन्हात काम करणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. ओआरएस आणि सरबताचा वापर करावा. उष्णता शोषून घेणारे गडद किंवा काळे कपडे टाळावेत, त्याऐवजी सैल पांढऱ्या रंगाचे सुती कपडे वापरावेत. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, टॉवेल किंवा फेटा यांचा वापर करावा. काम करताना मधून-मधून सावलीत विश्रांती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा…

– अतिशय थकवा येणे, ताप येणे आणि त्वचा कोरडी पडणे.
– भूक न लागणे, चक्कर येणे, डोकेदुखी आणि निरुत्साही वाटणे.

– रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता किंवा बेशुद्धावस्था येणे.
– रुग्णास तात्काळ हवेशीर किंवा वातानुकूलित खोलीत ठेवा. खोलीत पंखा किंवा कुलर सुरू करा. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी रुग्णास थंड पाण्याने – – अंघोळ घाला किंवा कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा आइसपॅक ठेवा. लक्षणे दिसताच काम थांबवून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्या.

Web Title: Scorching heat has intensified in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Sunstroke

संबंधित बातम्या

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात ट्विस्ट! चौकशी बंद करण्यासाठी संस्थाचालकांची धावपळ
1

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात ट्विस्ट! चौकशी बंद करण्यासाठी संस्थाचालकांची धावपळ

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती,  ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज
2

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती, ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.