Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: खुलताबाद पंचायत समितीत ‘अजब’ युती; भाजपचा सभापती तर ठाकरे गटाचा उपसभापती

खुलताबाद पंचायत समितीच्या रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपच्या सुनीता खंडागळे यांनी सभापती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 11, 2026 | 12:54 PM
Chhatrapati Sambhajinagar: खुलताबाद पंचायत समितीत ‘अजब’ युती; भाजपचा सभापती तर ठाकरे गटाचा उपसभापती
Follow Us
Follow Us:
  • खुलताबाद पंचायत समितीच्या या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि शिवसेना ठाकरे गटांनी हातमिळवणी
  • खुलताबाद पंचायत समितीच्या रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी
  • प्रस्थापित नेत्यांना शह देण्यासाठी किंवा सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हा टोकाचा निर्णय
Chhatrapati Sambhajinagar: राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात विस्तवही जात नाही. दोन्ही गटांकडून एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. पण राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रु नसतो, याचाही प्रत्यय आला आहे. खुलताबाद पंचायत समितीच्या या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि शिवसेना ठाकरे गटांनी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे. या अनपेक्षित राजकीय खेळीमुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

LPG Gas Shortage :”नाल्यातून गॅस निर्मिती अन् पुन्हा एकदा बैलगाड्यांचे युग…! गॅस तुटवड्यावरुन खासदार संजय

सत्तेचे नवे समीकरण

खुलताबाद पंचायत समितीच्या रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपच्या सुनीता खंडागळे यांनी सभापती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे, या निवडणुकीत ठाकरे गटानेच भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने त्यांची निवड सहज झाली. सत्ता स्थापनेत उपसभापतीपद ठाकरे गटाच्या वाट्याला आले. ठाकरे गटाच्या मंदाबाई बद्रीनाथ वाकळे यांना उपसभापतीपद देण्यात आले.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीचा संघर्ष असतानाही खुलताबादमध्ये स्थानिक पातळीवरील प्रस्थापित नेत्यांना शह देण्यासाठी किंवा सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या ‘अजब’ युतीमुळे केवळ स्थानिक नेतेच नव्हे, तर विरोधकही चक्रावून गेले आहेत.

 

पुणेकरांनो, थकीत प्रॉपर्टी टॅक्स लवकर भरा; अन्यथा कडक कारवाई केली जाणार

स्थानिक समीकरणांसाठी ‘टोकाचा’ निर्णय:

पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर नेते एकमेकांवर विखारी टीका करत असताना, खुलताबादमध्ये मात्र दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन जल्लोष करताना दिसले. स्थानिक पातळीवरील प्रस्थापित नेत्यांना शह देण्यासाठी आणि सत्तेचे गणित जुळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या अनपेक्षित युतीमुळे राजकीय विश्लेषकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

इतर पक्षांची कोंडी:

खुलताबादमधील या नव्या समीकरणामुळे इतर स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची मोठी कोंडी झाली आहे. या युतीचा थेट परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण ही युती केवळ या विशिष्ट निवडणुकीपुरती मर्यादित आहे की आगामी नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हा ‘खुलताबाद पॅटर्न’ पाहायला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Surprising alliance bjp and shiv sena ubt join hands in khultabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Local Body Election
  • Panchayat Samiti Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.