
आता सरकारी कागदपत्रांची पडताळणी होणार हायटेक! (Photo Credit - AI)
कशी काम करणार ही प्रणाली?
या प्रणालीमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी युजर आयडी व पासवर्ड आधारित सुरक्षित लॉगिन्ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत संबंधित शासकीय अधिकारी लॉगिन करून निर्गमित होणाऱ्या दस्तऐवजांना युनिक आयडी व क्युअर कोड मॅप करतात. हा युनिक आयडी व क्युअर कोड त्या दस्तऐवजाची ओळख व सत्यता सुनिश्चित करणार आहे.
सुलभ तपासणी होणार
नागरिक तसेच इतर शासकीय कार्यालये पोर्टलवर दस्तऐवजावरील क्युअर कोड स्कॅन करून किंवा युनिक आयडी टाकून संबंधित दस्तऐवजाची त्वरित पडताळणी करू शकतात. यामुळे तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी होणाऱ्या विविध आदेश, प्रमाणपत्रे व इतर शासकीय दस्तऐवजांची खात्रीशीर तपासणी सुलभ होणार आहे.
कुठेही, कधीही कागदपत्र पाहता येणार
जिल्हा प्रशासन अंतर्गत होणाऱ्या महसूल आणि इतर विभागाअंतर्गत होणारा पत्रव्यवहार तसेच यातून विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे नागरिकांना वितरित केले जातात हे वितरित करत असताना त्याचे प्रमाणिकीकरण ओळखण्यासाठी क्यूआर कोडद्वारे वेगळी ओळख कायमस्वरूपी देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना हे कागदपत्र कुठेही आणि कधीही संबंधित कागदपत्राचा क्यू आर कोड स्कॅन करून पाहता येणार आहे.
फसवणूक टळणार
बनावट, फेरफार केलेले किंवा संपादित दस्तऐवज ओळखून त्यापासून होणारे गैरप्रकार, फसवणूक व पुढील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरत असून, प्रशासनातील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होत आहे. ही सुविधा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आली असून, याचे डिझाइन व विकास प्रकल्प व्यवस्थापक, माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी केले आहे.