Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhaji Nagar Drainage News: वर्षभरापासून ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट; कंत्राटदार पसार झाल्याने साईनगरवासीय त्रस्त!

साईनगर मध्ये ड्रेनेज लाईनचे काम वर्षभरापासून अर्धवट आहे. कंत्राटदार निधीअभावी पसार झाल्याने रस्त्यावर खड्डे आणि सांडपाणी साचले आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 15, 2025 | 03:06 PM
वर्षभरापासून ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट (Photo Credit - X)

वर्षभरापासून ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • साईनगरमध्ये कंत्राटदाराचा ‘हात’ काढून पळ!
  • ड्रेनेज लाईनचे काम वर्षभरापासून ठप्प
  • नागरिकांचे अतोनात हाल
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहरातील हसूल परिसरातील साईनगर (गट नंबर १४४) येथे सुरू असलेले ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम कंत्राटदाराने अर्धवट सोडून पसार झाल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. गेल्या वर्षभरापासून हे काम बंद अवस्थेत असून, वारंवार तक्रारी करूनही संभाजीनगप महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने साईनगरवासियांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

निधीअभावी कंत्राटदाराने काम सोडले

महापालिकेने नगरोत्थान योजनेअंतर्गत मध्य विधानसभा मतदारसंघात ड्रेनेज प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली होती. या प्रकल्पाचे कंत्राट गुजरात येथील अंकिता इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले होते. हसूल येथील साईनगर भागात गल्ली-गल्ल्यांमध्ये खोदकाम करून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने व बिल रखडल्यामुळे कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून पलायन केले.

खड्डे आणि साचलेले सांडपाणी

काम बंद झाल्यानंतर परिसरात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे, तसेच अनेक अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. सात ते आठ गल्ल्यांमध्ये ड्रेनेजची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud: NSE च्या नावावर ‘ट्रेडिंग’चा खेळ! बँक अधिकाऱ्याला २६ लाखांना गंडवले

तक्रारींचा उपयोग नाही

नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नागरिकांनी कार्यकारी अभियंता अनिल तनपूरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

‘काम कधी पूर्ण होणार?’

वर्षभर उलटूनही ड्रेनेज लाईनचे काम सुरू झालेले नसल्याने, “हे काम कधी पूर्ण होणार?” असा सवाल साईनगरवासीय नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रखडलेले ड्रेनेजचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी साईनगरवासीयांनी केली आहे. या मागणीच्या निवेदनावर निर्मला पवार, संजय कुचे, मदन सानप, कचरू मिसाळ, रामदास बलांडे, श्रीराम काळे, संदीप काळे, मधूकर भालेराव, जगन्नाथ दळवी, संजय गोरे, संगिता वेताळ, सुरेश बुरकुळे, कैलास खमाट, वैभव दळवी आदी नागरिकांच्या सह्या आहेत.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar: संक्रांतीपूर्वी ग्रामीण पोलिसांची मोठी मोहिम! नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी ४ तालुक्यांत धडक कारवाई

Web Title: The drainage line work has been left incomplete for a year the residents of sainagar are troubled as the contractor has disappeared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Smart City: स्मार्ट सिटीचे प्रकल्प मनपाच्या गळ्यात! सफारी पार्क आणि नाट्यगृहासाठी छत्रपती संभाजीनगरकरांना अजून प्रतीक्षा
1

Smart City: स्मार्ट सिटीचे प्रकल्प मनपाच्या गळ्यात! सफारी पार्क आणि नाट्यगृहासाठी छत्रपती संभाजीनगरकरांना अजून प्रतीक्षा

अजिंठा हादरलं! आधी बिबट्याची डरकाळी, मग घरासमोरच…; शेतकरी कुटुंबाचा दोन तास जीव मुठीत
2

अजिंठा हादरलं! आधी बिबट्याची डरकाळी, मग घरासमोरच…; शेतकरी कुटुंबाचा दोन तास जीव मुठीत

Mayor Election Schedule: महापौर निवडणुकीची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार मतदान; कोणाचं पारडं जड?
3

Mayor Election Schedule: महापौर निवडणुकीची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार मतदान; कोणाचं पारडं जड?

Bank employees’ Strike: बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार! पाच दिवसांच्या आठवड्यासाठी  बँका ठप्प; ६०० कोटींचे व्यवहार रखडले
4

Bank employees’ Strike: बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार! पाच दिवसांच्या आठवड्यासाठी बँका ठप्प; ६०० कोटींचे व्यवहार रखडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.