Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीला ‘ऑलेक्ट्रा’चा झटका! ३२ कोटींचा बस डेपो सज्ज, पण चार्जिंग स्टेशन अद्याप रखडले

छत्रपती संभाजीनगरमध्ये ३२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला जाधववाडी ई-बस डेपो चार्जिंग स्टेशनअभावी रखडला आहे. ऑलेक्ट्रा कंपनीने ३५ पैकी केवळ २ बसेस दिल्या असून उर्वरित बसेस जून २०२६ पर्यंत देण्याचे आश्वासन दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 29, 2026 | 02:28 PM
छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीला ‘ऑलेक्ट्रा’चा झटका! ३२ कोटींचा बस डेपो सज्ज, पण चार्जिंग स्टेशन अद्याप रखडले
Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीला ‘ऑलेक्ट्रा’चा झटका!
  • ३२ कोटींचा बस डेपो सज्ज
  • पण चार्जिंग स्टेशन अद्याप रखडले
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): स्मार्ट सिटी योजनेंतर्गत जाधववाडी भाजीमंडई परिसरात उभारण्यात आलेला अत्याधुनिक शहर बस डेपो पूर्णत्वास गेला असला, तरी ई बससाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनचे काम रखडल्याने संपूर्ण प्रकल्प अडचणीत सापडला आहे. मनपा व स्मार्ट सिटी प्रशासनाने ऑलेक्ट्रा कंपनीकडून ३५ ई-बस घेण्यासाठी केलेला करार अद्याप प्रत्यक्षात उतरलेला नाही. चार वर्षांपासून मुदतवाढीवर मुदतवाढ दिली जात असताना कंपनीकडून केवळ दोन बसेस पाठविण्यात आल्या असून उर्वरित बसेस जून २०२६ पर्यंत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

स्मार्ट सिटीमार्फत बाजार समितीच्या जाधववाडी भाजीमंडई येथे सुमारे ३२ कोटी रुपये खर्चुन आधुनिक बस डेपो उभारण्यात आला. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. डेपोमध्ये इंधन पंपाची सुविधा सुरू करण्यात आली असली, तरी ई-बससाठी आवश्यक असलेले चार्जिंग स्टेशन अद्याप कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे नव्या ई-बस रस्त्यावर उतरविण्याचा प्रश्न कायम आहे.

पीएमजेवाय योजनेंतर्गत शहरासाठी शंभर बसेस मंजूर झाल्या आहेत. त्याचबरोबर स्मार्ट सिटी आणि महापालिकेने ऑलेक्ट्रा कंपनीशी स्वतंत्र करार करून ३५ ई-बस घेण्याचा निर्णय घेतला होता. २०२२ मध्ये हा करार करण्यात आला. मात्र, चार्जिंग स्टेशन नसल्याचा मुद्दा पुढे करत कंपनीने बसेस पाठविण्यास टाळाटाळ केली.

छत्रपती संभाजीनगरचा भव्य विस्तार! ३११ गावांच्या विकासासाठी स्वतंत्र ‘DPR’ तयार होणार; २२० कोटींचा निधी सज्ज

दरमहा भरावे लागले असते ४० लाख रुपये

बस डेपोसाठी हर्सल उपकेंद्रातून एक्सप्रेस फिडरद्वारे वीज आणण्यात आली आहे. मात्र, चार्जिंग स्टेशन कार्यान्वित नसल्याने अद्याप वीज वापर सुरू करण्यात आलेला नाही. महावितरणकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रत्यक्ष वापर सुरू झाला झाला नाही. वीजजोडणी सुरू केल्यास वापर नसतानाही दरमहा सुमारे ४० लाख रुपयांचे किमान बिल भरावे लागले असते. त्यामुळे चार्जिंग स्टेशन रखडल्याने आर्थिक भार टळल्याचीही चर्चा आहे.

चार्जिंग स्टेशनची जबाबदारी कंपनीवरच

हसूल उपकेंद्रातून बस डेपोपर्यंत उच्चदाब वीजवाहिनी आणि डीपी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. डेपोला वीजपुरवठ्याची पायाभूत सुविधा तयार असली, तरी चार्जिंग स्टेशन उभारण्याची जबाबदारी ऑलेक्ट्रा कंपनीवरच आहे. सध्या फाउंडेशनच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली असली, तरी प्रत्यक्ष यंत्रणा उभारण्यात कोणतीही गती दिसत नाही. खर्च कंपनीलाच करावा लागणार असल्याने जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याची चर्चा प्रशासनात आहे.

दावा अजून कागदावरच

ई-बस प्रकल्पाला उशीर होत असल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणालाही फटका बसत आहे. पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था उभारण्याचा महापालिकेचा दावा अद्याप कागदावरच असल्याचे चित्र आहे.

केंद्राची ‘भारत औद्योगिक विकास योजना’ जाहीर; देशात उभे राहणार १०० इंडस्ट्रियल पार्क, संभाजीनगरच्या ‘ऑरिक’ला सुवर्णसंधी!

Web Title: The olectra shock 32 crore bus depot ready but charging station still stalled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Charging Station
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Smart City

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
1

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम
2

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला
3

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू
4

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.