Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar News: गरिबांचा आठवडी ‘मॉल’ बंद! वाहतूककोंडी टाळण्यासाठी निर्णय; पर्यायी व्यवस्था करून देणार

महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वीपासून सुरू असलेले चिकलठाणा, जाफरगेट आणि पीर (सोमवार) आठवडी बाजार शहराच्या वाढत्या गरजांमुळे आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 26, 2026 | 03:00 PM
Chhatrapati Sambhajinagar News: गरिबांचा आठवडी ‘मॉल’ बंद! वाहतूककोंडी टाळण्यासाठी निर्णय; पर्यायी व्यवस्था करून देणार
Follow Us
Follow Us:

 

  • गरिबांचा आठवडी ‘मॉल’ बंद !
  • वाहतूककोंडी टाळण्यासाठी निर्णय
  • पर्यायी व्यवस्था करून देणार
Chhatrapati Sambhajinagar Weekly Market Closed: छत्रपती संभाजीनगर आठवाडीबाजाराने रहदारीचा कोंडला जाणारा श्वास मोकळा करण्यासाठी शहरातील जुने बाजार कायमचे बंद करण्याचा अजब निर्णय महापालिकेने घेतला आहे. छावणी, सोमवार रविवार बाजार आणि चिकलठाणा मध्ये अनेक वर्षापासून भरणारे बाजार सामान्यांचे ‘मॉल’ बनले होते. हेच ‘मॉल’ कायमचे बंद करण्याचा निर्णय प्रशासकांनी जाहीर केला. या निर्णयामुळे वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा दावा केला जात असला तरी संभाजी नगरकरांना वेठीस धरण्याबरोबर अनेकांचा रोजगार हिसकावून घेण्याचा ‘डाव’ असल्याचे बोलले जात आहे. प्रशासक राज संपून नव्याने सत्तेत आलेल्या महायुतीच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध न केल्याचे आता ‘मिळून सर्व खेळ’ खेळण्याचा प्रयत्न होतो की काय अशी चर्चा रंगली आहे.

महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वीपासून सुरू असलेले चिकलठाणा, जाफरगेट आणि पीर (सोमवार) आठवडी बाजार शहराच्या वाढत्या गरजांमुळे आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाजारांमुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघातांची शक्यता वाढत असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे.

सध्या या आठवडी बाजारांमध्ये दर आठवड्याला अंदाजे २५ ते ५० लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे. शेतकरी आणि फिरते विक्रेते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांना स्वस्त दरात ताजा भाजीपाला उपलब्ध होत होता. मात्र, हीच व्यवस्था आता नियोजित भाजीमंडईत स्थलांतरित केली जाणार आहे.

याशिवाय, बाजार संपल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील चिकलठाणा, जाफरगेट आणि शहानुरमिया दर्गा परिसरातील आठवडी बाजार बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्प सादरीकरणावेळी ही भूमिका स्पष्ट केली.

Marathwada Sugar Industry: साखरेचा गोडवा वाढला! मराठवाड्यात २ कोटी टनांचा टप्पा पार; पाहा तुमच्या विभागातील गाळपाची स्थिती

हा दिला पर्याय….

आठवडी बाजार बंद केल्यानंतर नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने पर्यायी योजना आखली आहे. शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेल्या भाजीमंडईतील गाळ्यांमध्येच भाजीपाला व इतर कृषी उत्पादने विक्रीस परवानगी दिली जाणार आहे.

वाहतूककोंडी, स्वच्छता

शहरातील प्रमुख रस्त्यांवर भरवले जाणारे आठवडी बाजार वाहतुकीस मोठा अडथळा ठरत होते. गर्दीमुळे किरकोळ अपघात होत होते. याशिवाय, बाजार संपल्यानंतर उरलेला कचरा व अस्वच्छता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. या पार्श्वभूमीवर नियोजित व स्वच्छ बाजारपेठ निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

उल्लंघन केल्यास कारवाई

आयुक्तांनी स्पष्ट केले की, यापुढे रस्त्यावर किंवा दुभाजकांवर कोणत्याही प्रकारचा आठवडी बाजार किवा अनधिकृत व्यवसाय करण्यास संपूर्ण बंदी राहील, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रग्ज सिंडिकेट’चा पर्दाफाश! गुजरात कनेक्शन उघड; ४४०० नशा गोळ्यांसह दोघांना बेड्या

Web Title: The poor mans weekly mall shut down decision taken to avoid traffic congestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग
1

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या
2

तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू; पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा
3

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू; पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!
4

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.