साखरेचा गोडवा वाढला! मराठवाड्यात २ कोटी टनांचा टप्पा पार (Photo Credit- X)
प्रादेशिक (साखर) सहसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड विभागातील कारखान्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप पूर्ण केले आहे. या गाळपातून तयार झालेल्या साखरेमुळे उत्पादनाचा आकडा दोन कोटी टनांच्या पुढे गेला आहे. हंगामाच्या सुरुवातीला राज्यातील एकूण साखर उत्पादनाचा अंदाज ज्या प्रमाणात व्यक्त करण्यात आला होता, त्या तुलनेत मराठवाड्यातील उत्पादनाची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. वाढते तापमान आणि उसाची उपलब्धता कमी होत चालल्यामुळे काही भागात गाळप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. साखर उद्योगाच्या प्रगतीमुळे शेतकरी, ऊसतोड कामगार संबंधित उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या हंगामात झालेल्या चांगल्या उत्पादनामुळे साखर उद्योगाला आर्थिक बळ मिळणार आहे.






