Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू; पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या १५०० मिमी आणि २००० मिमीच्या जलवाहिन्या पुढील १५ दिवसांत सुरू होणार आहेत. आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत वेळापत्रक जाहीर केले असून जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातूनही पाणी मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 26, 2026 | 04:55 PM
संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू

Follow Us
Follow Us:
  • संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी!
  • १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू
  • पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची प्रगती झाली असून १५०० मिमी व्यासाची जलवाहिनी पुढील दहा दिवसांत, तर २००० मिमी व्यासाची जलवाहिनी पंधरा दिवसांत कार्यान्वित केली जाणार आहे. सध्या दोन्ही जलवाहिन्यांची स्वच्छता, हायड्रोलिक चाचण्या आणि आवश्यक क्रॉस कनेक्शनची कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यात दररोज २०० एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याअंतर्गत २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून सध्या सरासरी ४० एमएलडी पाणी उचलले जात आहे.

नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे पाणी साठवून शहराला दररोज २० ते २५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. नक्षत्रवाडीहून शहराकडे टाकण्यात आलेल्या तीन प्रमुख जलवाहिन्यांपैकी १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अंतिम चाचण्या सुरू आहेत. या मार्गावरील एन-५ आणि एन-७परिसरातील जलकुंभांना क्रॉस कनेक्शन देण्यात आले असून एअर व्हॉल्व्हची तपासणी पूर्ण झाल्यानंतर हसूल-जटवाडा भागाला या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे शहरातील नागरिकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

जलकुंभाद्वारे विविध भागांना पाणी

सुमारे १७ किलोमीटर अंतरावरील जलकुंभांमार्फत हा पुरवठा करण्यात येणार आहे. यानंतर २००० मिमी व्यासाची जलवाहिनीही कार्यान्वित केली जाणार आहे. या जलवाहिनीशी जोडलेल्या नव्याने उभारलेल्या पाच जलकुंभांसह महापालिकेच्या विद्यमान जलकुंभांद्वारे शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!

मृतजलसाठ्यातूनही पाणी उपशाचा मार्ग मोकळा

जायकवाडी धरणातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी प्रस्तावित अॅप्रोच चॅनलच्या कामालाही गती मिळाली आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीने कामासाठी आवश्यक मार्किंग पूर्ण केले असून लवकरच प्रत्यक्ष खोदकाम सुरू होणार आहे. धरणातील पाणीपातळी ४४८ मीटरपर्यंत खाली गेली तरी पाणी उपसा करता यावा, यासाठी अॅप्रोच चॅनलची रचना करण्यात येत आहे. या कामामुळे भविष्यात दुष्काळी परिस्थितीतही मृतजलसाठ्यातून पाणी उपलब्ध करून घेणे शक्य होणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पुरवठ्याचे लक्ष्य

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराला दररोज २०० एमएलडी पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून ४० एमएलडी पाणी घेतले जात असून त्यापैकी २० ते २५ एमएलडी पाणी प्रक्रिया करून शहरात वितरित केले जात आहे. उर्वरित जलवाहिन्या सुरू झाल्यानंतर पुरवठ्याची क्षमता आणि वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!

Web Title: Good news for the residents of sambhajinagar both new water pipelines will become operational within 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Jayakwadi Dam
  • water scheme

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!
1

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!
2

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर
3

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले! ‘ई-पॉस’ प्रणालीची मुदत संपल्याने २४ लाख लाभार्थी संकटात
4

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०% धान्य वितरण रखडले! ‘ई-पॉस’ प्रणालीची मुदत संपल्याने २४ लाख लाभार्थी संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.