अजिंठ्यात ग्रामस्थांचे धाडस! गोठ्यात घुसलेल्या नरभक्षक बिबट्याला केले जेरबंद (photo Credit- X)
अंधारी शिवारातील गोठ्यात शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बिबट घुसलेला दिसताच येथील आदिल खान अमीर खान, शकील खान वाहेद खान, उमर खान हुसेन खान आणि सलीम पठाण या ग्रामस्थानी प्रसंगावधन राखून गोठ्याचे दार बंद केले. यावेळी गोठ्याबाहेर असलेल्या दुसऱ्या बिबट्याने या नागरिकांच्या अंगावर झेप घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी या सलीम पठाण यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने आसपासचे नागरिक गोठ्याजवळ आले. या नागरिकांना पाहताच बिबट्याने धुम ठोकली. दुसरा बिबट्या मात्र गोठ्यात बंदिस्त होता. त्याला बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग नव्हता. घटनेची माहिती गावातील नागरिकांना कळताच शेतशिवारात मोठी गर्दी झाली.
साठेबाजांवर कडक नजर! जिल्ह्यातील हॉटेल्समध्ये गॅस सिलिंडरची झाडाझडती; घरगुती गॅस वापरला तर थेट…
नागरिकांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी दोन पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू टीमने मुख्य दरवाजाजवळ एक पिंजरा आणि जाळी लावली. तसेच सुरक्षेच्या उपाययोजना राबवून दोन तासात बिबट्याला पिंजऱ्यात बंद केले. छत्रपती संभाजीनगरचे शिघ्र कृतीदलाचे शेख मोईनुद्दीन यांनाही तत्काळ पाचारण करण्यात आले होते. या अधिकाऱ्यांनी पिंजऱ्यात बंद केलेल्या बिबट्याला नंतर वन विभागाच्या कार्यालयात बिबट्याला नेण्यात आले. रविवारी सकाळी बिबटयाला जेरबंद झाल्यावर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
अजिंठा परिसरात बिबट्याने अक्षरश: धुमाकुळ घालत शुक्रवारी (दि. १३ मार्च) रात्री अधारी शिवारातील युसुफ खान अय्युब खाँ पठाण, यांच्या गट क्र. ३६ मधील शेतातील बांधलेल्या गोठ्यामध्ये प्रवेश करून ४ शेळ्यावर हल्ला करून ठार केले होते. शिवणा परिमंडल दिपक सोनार, मुकेश गुप्ता, लेखपाल योगेश शिदे आदी वनकर्मचाऱ्यांनी सदर ठिकाने ट्रैप कैमरे लावून बिबट्यावर पाळत ठेवली होती.
मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली; जायकवाडीत ७२% साठा शिल्लक






