Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: पेनटाकळीत पाणीसाठा मुबलक, तरी वाशिमच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम; शिवसेनेचा जलसंपदा विभागाला थेट इशारा

Washim Pen Takli Project Shiv Sena protest: वाशिम जिल्ह्याच्या हक्काचे ३.७२ दशलक्ष घनमीटर पाणी पेनटाकळी प्रकल्पातून तातडीने सोडण्याची मागणी शिवसेनेच्या संजना गवळी यांनी केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 22, 2026 | 06:17 PM
Washim Pen Takli Project Shiv Sena protest

Washim Pen Takli Project Shiv Sena protest

Follow Us
Follow Us:
  • वाशिमच्या 643 हेक्टर क्षेत्राचा पाणीप्रश्न ऐरणीवर
  • शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
  • जलसंपदा विभागाला धरले धारेवर

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही वाशिम जिल्ह्याच्या हक्काचे पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.

पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पातून वाशिम जिल्ह्याच्या वाट्याचे ३.७२ दशलक्ष घनमीटर पाणी तातडीने सोडण्यात यावे, अशी आक्रमक मागणी शिवसेनेच्या अमरावती विभागीय संपर्कप्रमुख संजना गवळी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुलडाणा येथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रशासनाला धारेवर धरले. पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिला. पैनगंगा नदीच्या लाभक्षेत्रातील वाशिम जिल्ह्यातील ६४३ हेक्टर क्षेत्राला पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याचा लाभमिळणे अपेक्षित आहे. (Washim News)

B Prabhakaran : गडचिरोलीच्या विकासाचा चेहरा ठरलेल्या बी. प्रभाकरन यांचा जागतिक सन्मान; पुरस्कार जनतेला समर्पित

त्यासाठी ३.७२ दशलक्ष घनमीटर पाणी वाशिम जिल्ह्याच्या हिश्श्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध असतानाही हे पाणी अद्याप सोडण्यात आले नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप संजना गवळी यांनी केला. एका बाजूला प्रकल्पात पाणी उपलब्ध असताना दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पाण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत. हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर – अन्याय असल्याची भूमिका त्यांनी मांडली. जिल्ह्यात सध्या पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होत आहे.

शेतकऱ्यांसमोर उभे असलेले पिके वाचविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही, तर उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. दुसरीकडे अनेक भागांत नागरिकांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा गंभीर परिस्थितीत पेनटाकळी प्रकल्पातील वाशिम जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पैनगंगा नदीत सोडणे अत्यंत आवश्यक असल्याचे गवळी यांनी स्पष्ट केले.

वाशिम जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कार्यवाही अपेक्षित आहे. संबंधित विभागाने तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय न घेतल्यास शेतकरी आणि नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

सिंचनासह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी पाण्याच्या नियोजनाबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली, वाशिम जिल्ह्याच्या वाट्याचे ३.७२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करून देण्यास विलंब का होत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला, शेतकऱ्यांच्या सिंचनाचा आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Road Robbery: रात्रीच्या अंधारात लुटमारीचा थरार अन् ‘पोलिस’ बनून वृद्धाची फसवणूक! पुण्यासह बारामतीत गुन्हेगारी टोळ्यांचा धुडगूस

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाशिम जिल्ह्यासाठी पेनटाकळी प्रकल्पातील किती पाणी मंजूर आहे?

    Ans: वाशिम जिल्ह्याच्या वाट्याचे ३.७२ दशलक्ष घनमीटर पाणी निश्चित करण्यात आले आहे.

  • Que: पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याची मागणी कोणी केली?

    Ans: शिवसेनेच्या अमरावती विभागीय संपर्कप्रमुख संजना गवळी यांनी ही मागणी केली.

  • Que: पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्याचा वाशिममधील किती क्षेत्राला लाभ होणार आहे?

    Ans: वाशिम जिल्ह्यातील ६४३ हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा लाभ अपेक्षित आहे.

Web Title: Washim pen takli project water release shiv sena protest pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • Shiv Sena
  • Washim news
  • Water Crisis
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Washim: वाशिमच्या मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! दावे-हरकतींच्या निपटाऱ्याला मुदतवाढ; जिल्हाधिकारी कुंभेजकरांची माहिती
1

Washim: वाशिमच्या मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! दावे-हरकतींच्या निपटाऱ्याला मुदतवाढ; जिल्हाधिकारी कुंभेजकरांची माहिती

Washim: सोयाबीनला सोन्याचा भाव! वाशिमच्या चारही बाजार समितीत गाठला उच्चांक; क्विंटलमागे तब्बल ‘इतके’ रुपये
2

Washim: सोयाबीनला सोन्याचा भाव! वाशिमच्या चारही बाजार समितीत गाठला उच्चांक; क्विंटलमागे तब्बल ‘इतके’ रुपये

Washim: वाशिममध्ये रब्बी हंगामाला पाणीटंचाईचा फटका; हरभरा अन् चारा पिकांना पसंती, जिल्ह्यात पेरणी केवळ १० टक्के
3

Washim: वाशिममध्ये रब्बी हंगामाला पाणीटंचाईचा फटका; हरभरा अन् चारा पिकांना पसंती, जिल्ह्यात पेरणी केवळ १० टक्के

Farmer News: खरीपने रडवले, रब्बीची आशाही धूसर! पाण्याअभावी तूर पीकही संकटात; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
4

Farmer News: खरीपने रडवले, रब्बीची आशाही धूसर! पाण्याअभावी तूर पीकही संकटात; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.